Walse Patil Offer to Rohit Pawar : मी आमदारकी सोडतो, तुम्ही आंबेगावमधून उभे राहा; वळसे पाटलांनी दिली होती रोहित पवारांना ऑफर

होय, साहेबांनी मला सगळं दिलं, काही कमी पडू दिलं नाही. त्यामुळे जिवनाच्या अंतापर्यंत आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत.
Dilip Walse Patil-Rohit Pawar
Dilip Walse Patil-Rohit PawarSarkarnama

Manchar News : माझी आणि आमदार रोहित पवार यांची एके दिवशी भेट झाली. मी त्यांना म्हटलं की रोहित, मतदारसंघाचा जर प्रश्न असेल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे. पाहिजे तर मी आमदारकी सोडतो, तुम्ही आंबेगाव-शिरूर मतदारसंघातून उभे राहा. पण हे काम (डिंभे धरणातील पाणी बोगद्याद्वारे नेणे) करू नका. याच्याशिवाय, दुसरं कुठलंही भांडण साहेबांशी किंवा साहेबांच्या कुटुंबीयांशी नाही, असा खुलासाही मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला. (I leave Legislature; You should stand for Assembly from Ambegaon : Walse Patil)

वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत जाऊन शिवसेना-भाजप सरकारमध्ये मंत्री झाले आहेत. त्यानंतर वळसे पाटील हे प्रथमच मतदारसंघात आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचे खुलासे केले. ते म्हणाले की, अजून त्यांचं वय लहान आहे. मला सार्वजनिक जीवनात येऊन ४० वर्षे झाली आहेत. त्यांचं आजचं वय ३७ वर्षांचं आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की, तुम्हाला आणखीन काय काय द्यायला पाहिजे हेाते. होय, साहेबांनी मला सगळं दिलं, काही कमी पडू दिलं नाही. त्यामुळे जिवनाच्या अंतापर्यंत आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत.

Dilip Walse Patil-Rohit Pawar
Walse Patil News : मला ईडी, सीबीआयची नोटीस नाही, पण ‘या' कारणांमुळे अजितदादांसोबत गेलो; वळसे पाटलांनी भूमिका केली स्पष्ट

ज्यावेळी डिंभे धरणासंदर्भातील निर्णय पुढे जातो, म्हटल्यानंतर माझी आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांची भेट झाली. मी त्यांना म्हटलं की रोहित, मतदारसंघाचा प्रश्न असेल तर माझी तुम्हाला एक विनंती आहे. पाहिजे तर मी आमदारकी सोडतो, तुम्ही आंबेगाव-शिरूर मतदारसंघातून उभे राहा. पण हे काम करू नका. याच्याशिवाय, दुसरं कुठलंही भांडण साहेबांशी किंवा साहेबांच्या कुटुंबीयांशी नाही. मी सत्तेसाठी हपालेलेही नाही, असेही वळसे पाटील यांनी नमूद केले.

Dilip Walse Patil-Rohit Pawar
Praful Patel News ‘खासदार प्रफुल्ल पटेल त्याचवेळी राजीनामा देणार होते...’

वळसे पाटील म्हणाले की, कळमोडी धरणाचे पाणी सातगाव पठारला, आदिवासी भागातील शेतीला पाणी, थिटेवाडी, म्हाळसाकांत, पांडवदरा आदी प्रकल्प, तांबडेमळा उपजिल्हा रुग्णालय, एसटी आगार आदी कामे मार्गी लावायची आहेत. मी का निर्णय घेतला हे जनतेच्याही लक्षात आले आहे. निवडणुकीची चिंता करत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काही गावांमध्ये आपल्याच लोकांमध्ये दोन गट पडले आहेत. त्यांच्याही एकत्रित बैठका घेण्याचे काम तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांनी करावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com