सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) जिल्हाध्यक्ष होण्यास मी एकदा नव्हे; तर दोन वेळा नकार दिला होता. कारण, माझा अक्कलकोट मतदारसंघ क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे आणि मला माझ्या मतदारसंघाची बांधणी करायची होती. मात्र, आमचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आदेश दिल्यामुळे यावेळी मी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद स्वीकारले, असे अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी सांगितले. (I refused twice to become Solapur District President of BJP; Because... : Sachin Kalyanshetti)
आमदार कल्याणशेट्टी यांनी आज (ता. २१ नोव्हेंबर) ‘सकाळ’च्या सोलापूर कार्यालयास भेट दिली. त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी जिल्हाध्यक्षपद आणि त्यासंदर्भाने घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले.
आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना ते माझ्या घरी आले होते. त्यावेळी त्यांनी मला जिल्हाध्यक्षपद स्वीकारण्यास सांगितले होते. मात्र, मी अक्कलकोट मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आला होतो. त्यावेळी मला माझ्या मतदारसंघाकडे लक्ष देण्याचे गरजेचे वाटत होते, त्यामुळे मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी मी भाजपचा जिल्हाध्यक्ष होण्यास नकार दिला होता.
चंद्रकांत पाटील यांना नकार देणारे कल्याणशेट्टी यांना मात्र श्रीकांत देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर जिल्हाध्यक्षपद स्वीकारावे लागले. त्याबद्दलही कल्याणशेट्टींनी सांगितले. ते म्हणाले की, दुसऱ्या वेळी मला जिल्हाध्यक्ष होण्यास पक्षाकडून सांगण्यात आले होते. मात्र, मी यावेळी हे पद स्वीकारण्यास इच्छूक नव्हतो. कारण, मला मतदारसंघाची मजबूत बांधणी करायची होती. त्यामुळे जिल्हाध्यक्ष होण्यास मी नकार दिला होता. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आदेश दिला. आमच्या पक्षात नेत्यांचा आदेश मान्य करावा लागतो, त्याप्रमाणे मी अखेर जिल्हाध्यक्षपद स्वीकारले.
'केवळ चार महिन्यांत अक्कलकोटला १०० कोटी मिळाले'
महाविकास आघाडी सरकाच्या काळात विरोधी आमदारांवर निधी वाटपात अन्याय झाला होता. तो अनुशेष भरून काढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. निधी वाटपाच्या भेदभावाचे उदाहारण सांगताना त्यांनी महाविका आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात मला केवळ ३५ कोटी रुपये निधी मिळाला होता, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या चार महिन्यांच्या काळात अक्कलकोटला १०० कोटींपेक्षा जास्त निधी मिळाल्याचे कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.