मुंबई : मुंबईत (Mumbai) मंत्रालयात (ministry) इतर मागास बहुजन कल्याण विभागात अवर सचिव (Secretary) स्तरावर असलेल्या एका अधिकाऱ्याने एका उपसंचालक महिला अधिकारी (women officer) म्हणून गेली असताना ‘मला बरे वाटत नाही. मी बोअर झालो आहे, मला गाणं म्हणून दाखव’ अशा स्वरुपाची हिन प्रकारची भूमिका घेतली. ज्यांच्या केबिनमध्ये हा प्रकार घडला, अशा पद्धतीचे वक्तव्य एका मंत्र्यांच्या अवर सचिवाने केले. त्यावेळी त्या ठिकाणी उपसचिव देखील उपस्थित होते. (I'm bored, show me as a song : Additional Secretary's demand to women officer)
दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी याप्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. आमदार गोऱ्हे म्हणाल्या की, ही घटना १८ ऑक्टोबर २०२२ रोजी घडली आहे. याबाबतची तक्रार संबंधित महिला अधिकाऱ्याने त्या विभागाच्या मंत्र्यांकडे अर्जाद्वारे केली आहे. तसेच, त्या उपसंचालक महिलेने मुख्य सचिवांकडेही अर्ज करून तक्रार देण्यात आलेली आहे. याबाबतची माहिती माझ्याकडे येताच संबंधित महिला अधिकाऱ्याचा प्रश्न मी समजून घेतला आहे. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी घडल्यानंतर तातडीने मंत्र्यांच्या अन्य अधिकाऱ्यांकडेसुद्धा त्यांनी तक्रार नोंदविण्यात आलेली आहे.
ज्या कार्यालयीन कामासाठी महिला अधिकार येतात. अशा वेळी निष्फळ आणि महिलांचा कुचेष्टा करणारी थट्टा करायची, हे योग्य नाही. यासंदर्भात त्यांची फक्त औपचारिक स्वरूपाची ओळख होती. म्हणून मला असं वाटतंय की या दोघांची म्हणजे अवर सचिव आणि उपसचिव यांना पदावरून तात्पुरत्या स्वरूपात मुक्त केले पाहिजे. किंबहुना निष्पक्षपाती चौकशी व्हायची असेल तर या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव यांनी लक्ष घालावे आणि या प्रकरणाची चौकशी करावी. संबंधित महिला अधिकाऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीतून बाजूला करावे, तरच या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी होणार नाही, असा दावाही गोऱ्हे यांनी केला आहे.
अशा प्रकारची वक्तव्ये मंत्रालयात होत असतील आणि या प्रकरणाची पत्रकार परिषद संभाजीनगरला २० ऑक्टोबरला हेाऊनसुद्धा दहा झाले आहेत, तरीही त्याची दखल घेतली जात नसेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे, असं मला वाटतं. त्यामुळे सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावं, असे मी निर्देश देत आहे, असेही आमदार गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.