

सिद्धेश्वर मारटकर
Astrology Forecast, December 2025 : ५ डिसेंबर २०२५ रोजीच्या पौर्णिमान्त कुंडलीमध्ये तूळ लग्न उदित होत असून, अष्टमस्थानामध्ये वृषभ राशीत पौर्णिमा होत आहे. धनस्थानात रवी, मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात शनी, नेपच्यून व दशमात गुरू अशी प्रमुख ग्रहस्थिती आहे. ग्रहस्थितीचा विचार करता अष्टमातील पौर्णिमा भूकंप, वादळे, मोठा पाऊस या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींतून हानी दर्शविते.
रवी-मंगळाचा प्रतियोग होत असल्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर या काळात मोठ्या राजकीय/सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता वाटते. या जोडीला शुक्र असल्यामुळे गायन, संगीत, कलाक्षेत्रातील मोठ्या कलाकाराचा किंवा स्त्रीचा मृत्यू होण्याची शक्यता दर्शविते. हा काळ पोलिस, लष्करासाठी प्रतिकूल असून, जवानांवरील हल्ल्याची शक्यता दर्शविते. मोठे अधिकारी, पोलिस खात्यातील वरिष्ठ व लष्करातील अधिकारी यांचे राजीनामे किंवा मृत्यूच्या घटना संभवतात.
शनी-नेपच्यून युतीमुळे हा काळ शेअर मार्केटसाठी प्रतिकूल राहू शकतो. मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होईल. मोठे करेक्शन झाल्याने उद्योगदारांचे मोठे नुकसान संभवते. हा काळ लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी त्रासदायक राहील. महत्त्वाच्या परीक्षांसंदर्भात गोंधळ उडेल.
दशम बिंदूजवळ गुरू असल्यामुळे या काळात निवडणुका झाल्यास सत्ताधारी महायुतीसाठी अनुकूल निकाल लागतील, तर विरोधी महाआघाडीमध्ये विसंवाद किंवा मतभेदाचे राजकारण अनुभवास येतील. रवीच्या दशमांत केतू असून रवी-हर्षल प्रतियोगामुळे निवडणुकीनंतर सत्ताबदल किंवा प्रमुख पदावरील नेत्यांचे राजीनामे होण्याची शक्यता दिसते. केंद्रस्थानातील बुधामुळे व्यापारीवर्गाला उत्तम काळ राहील. परदेशी व्यापाराला चालना मिळेल. ट्रम्प टेरिफमुळे अस्थिर झालेला आंतरराष्ट्रीय व्यापार पुन्हा सुरळीत होईल.
लग्नातील बुध व केंद्रस्थानातील गुरू या योगामुळे या काळात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होईल. . क्रीडा-स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना मोठे यश मिळेल. काही ज्येष्ठ खेळाडूंची निवृत्ती किंवा मृत्यूच्या घटना संभवतात.
नितीशकुमार कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि संयुक्त जनता दलाने मित्रपक्षांसह मोठ्या बहुमताने विजय मिळविला. त्यामुळे नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी वेळेच्या पत्रिकेचा विचार करता ‘मकर (चर)’ लग्नावर शपथ घेतली असून, वृश्चिक राशीत अमावस्या होत आहे. रवी-चंद्राच्या प्रतियोगात हर्षल आहे, तर अष्टमात सिंह राशीत केतू आहे.
या ग्रहस्थितीचा विचार करता नितीशकुमार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करण्याची शक्यता कमी राहील. ऑगस्ट 2026 नंतर त्यांचा उत्तराधिकारी जाहीर होण्याची शक्यता राहील. प्रकृतीमुळे पक्षातील दुसऱ्या फळीच्या नेतृत्वाला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकते किंवा त्यांच्या सहमतीने भाजपच्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकते.
मेष : घर-वाहन खरेदीसाठी उत्तम काळ राहील. शुभकार्यासाठी खर्च होतील. चंद्र-शुक्र शुभयोगामुळे मोठे प्रवास होतील. मात्र, चंद्र-शनी योगामुळे तब्येत नरमगरम राहील. प्रवासात विलंब किंवा अडचणी येतील.
वृषभ : सप्ताहाच्या सुरुवातीला नवीन ओळखी होतील. तरुणांचे विवाह जमतील. कोर्ट-कचेरी वादविवादात सामंजस्याने निर्णय होतील. पैशांची कामे विलंबाने होतील. जोडीदाराशी मतभेद टाळावेत.
मिथुन : नोकरी-व्यवसायात चांगले बदल होतील. उत्पन्नात वाढ होईल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. कामाचा ताण वाढण्याची शक्यता राहील. उत्तरार्धात मोठे प्रवास होतील. कर्जाची कामे होतील.
कर्क : धार्मिक, मंगल कार्ये होतील. तीर्थयात्रा छोटे प्रवास होतील. महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. प्रवासात अडथळे येतील. उत्तरार्धात नोकरीमध्ये पदोन्नती-बदली संभवते. निवडणुकीत यश मिळेल.
सिंह : चंद्र-गुरू शुभ योगामुळे अचानक मोठे लाभ होतील. घर, मालमत्तेमधून पैसा मिळेल. जागा-घराचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
कन्या : भागीदारीच्या व्यवसायात लाभ होतील. कोर्टकचेरीमध्ये मनासारखे निर्णय होतील. जोडीदाराशी मतभेद टाळावेत. भावंडे-नातेवाइकांशी संबंध सुधारतील. कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल.
तूळ : नोकरीमध्ये अनुकूल बदल संभवतो. वरिष्ठांची मर्जी राखाल. हाताखालच्या लोकांकडून मोठी मदत होईल. कर्जाच्या कामात विलंब-कायदेशीर अडथळा निर्माण होईल. कौटुंबिक सलोखा वाढेल.
वृश्चिक : मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. शेअर बाजारात अडकलेले पैसे मोकळे होतील. चंद्र-शुक्र शुभयोगामुळे मन आनंदी-उत्साही राहील. कला-खेळ-स्पर्धेमध्ये यश मिळेल.
धनू : चंद्र-गुरू शुभ योगामुळे कर्जाची कामे सुलभ होतील. वारसा हक्काच्या कामातून लाभ होईल. उत्तरार्धात नोकरीमध्ये प्रमोशन, वेतनवाढ मिळेल. मात्र, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मकर : विवाहेच्छुकांचे विवाह जमतील. भावंडांसंबंधित शुभवार्ता कळेल. घर-जागेमधून लाभ होईल. मुलांबरोबर मतभेद होतील. तरुणांना प्रेमप्रकरणात यश मिळेल.
कुंभ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात विवाह-मंगलकार्य ठरतील. नोकरीमध्ये वेतनवाढ होईल. चंद्र-शुक्र शुभयोगामुळे नवीन नोकरीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.
मीन : संततीकडून सौख्य मिळेल. शेअर्समधून लाभ होतील. धार्मिक मंगल कार्यातून आनंद घ्याल. चंद्र-शुक्र शुभयोगामुळे मन आनंदी-उत्साही राहील. कला, खेळ यांमधून प्रसिद्धी-यश-नावलौकिक वाढेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.