Sakal-Saam Survey on State Government : शरद पवार यांनी मंगळवारी (ता. २) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. तसेच राज्यसभेची टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पवारांच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर 'सकाळ-साम'च्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनाम्याबाबत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला आहे. यात सर्व वयोगटातील महिला व पुरुषांनी आपली मते व्यक्त केलेली आहेत. या सर्वेक्षणात प्रामुख्याने शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय योग्य की अयोग्य, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी कुणाला पसंती, अजित पवार भाजपसोबत जाणार का, आदी प्रश्नांवर मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या ७३.४ टक्के समर्थकांना पवारांनी पद सोडू नये असे सांगितले. तर सर्वपक्षीय ४७.५ टक्के लोकांनी पवारांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, असे मत व्यक्त केले. तसेच ४५.९ टक्के लोकांनी त्यांचा निर्णय योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच इतरांनी काही सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे.
सर्वेक्षात सर्व प्रश्न शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर नेत्यांबाबत विचारण्यात आले होते. त्यातच एक प्रश्न विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारबाबतही विचारण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाऊन भाजपने चूक केली का? असाही एक प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नावर सर्वेक्षणात सहभागी लोकांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. या प्रश्नावर ५७.५ टक्के लोकांना भाजपने (BJP) ही चूक केली, असे सांगितले आहे. तर ३१.९ टक्के लोकांना भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सत्ता स्थापन केल्याची चूक वाटत नाही. तसेच या प्रश्नावर १०.६ टक्के लोक नेमके काही सांगू शकले नाहीत.
पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होणार असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीवर परिणाम होईल असे ६०.७ टक्के लोकांना वाटते. तर २८.४ टक्के लोकांनी महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच १०.९ टक्के लोकांनी सांगता येणार नाही, असे उत्तर दिले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.