बंगळूर : कर्नाटक विधानसभेच्या सर्व २२५ जागांची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेस ११४ जागांवर, भाजप ७९, तर जेडीएस २४ जागांवर आघाडीवर आहेत. बहुमताची आकडा कलामध्ये तरी काँग्रेसने पार केला आहे. मात्र, मोठा गाजावाज करत भाजप सोडून काँग्रेसमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार हे पिछाडीवर आहेत, तर माजी उपमुख्यमंत्री आघाडीवर आहेत. (Jagdish Shettar, who came to Congress from BJP, is trailing, while Laxman Sawadi is leading)
कर्नाटकाच्या (Karnataka) निवडणुकीच्या (Election) मैदानात मुख्यमंत्री बसवराज बोम्मईपासून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार, माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांचा समावेश आहे. निवडणुकीच्या निकालाचे ट्रेंडमध्ये अनेक बडे नेते मागे असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचे पिछाडीवर राहणे मराठी भाषिकांसाठी धक्कादायक आहे.
शिवगामधून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे आघाडीवर आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या हे वरुणामधून, तर प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार हे कनकपुरामधून आघाडीवर आहेत. जनता दलाचे कुमारस्वामीही आघाडीवर आहेत.
दुसरीकडे, भाजमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार हे हुबळी-धारवाडमधून पिछाडीवर आहेत. त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी मात्र आघाडीवर आहेत. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे चिरंजीवर प्रियांक खर्गे हेही आघाडीवर आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे चिरंजीवी बी. वाय. विजयेंद्र हेही आघाडीवर आहेत.
मतदारसंघ...............पक्षनिहाय उमेदवार................ कल
शिग्गांव .........बसवराज बोम्मई (भाजप).... आघाडीवर
वरुणा.........सिद्धारमय्या (काँग्रेस)........ आघाडीवर
कनकपुरा...… डी. के. शिवकुमार (काँग्रेस) ....आघाडीवर
चन्नापट्टन...… एचडी कुमारस्वामी (जेडीएस).....आघाडीवर
चिकमंगळूर........सीटी रवि (भाजपा).............. पिछाडीवर
अथणी......… लक्ष्मण सावदी (काँग्रेस) ............आघाडीवर
हुबळी–धारवाड सेंट्रल........ जगदीश शेट्टार (काँग्रेस) ..... पिछाडीवर
सिरसी........... विश्वेश्वर हेगड़े कागेरी (भाजपा) ..........आघाडीवर
शिकारीपूर............ बीवाई विजयेंद्र (भाजपा)..............आघाडीवर
चित्तपुर................ प्रियांक खर्गे (काँग्रेस) .................आघाडीवर
होलेनरसीपुर..........एचडी रवन्ना (जेडीएस)................ आघाडीवर
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.