Kishor Kadam On Bhide : ...हा तर अजित पवारांना हतबल करण्याचा प्रयत्न; भिडेंच्या विधानावर कवी सौमित्रांची पोस्ट

फडणवीसजी या दोघांची मजा बघत बसणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.
Sambhaji Bhide-Kishor Kadam
Sambhaji Bhide-Kishor KadamSarkarnama
Published on
Updated on

Pune : शिवप्रतिष्ठानचे मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अनुद्‌गार काढले. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात आता अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांनीही उडी घेतली आहे. फेसबुक पोस्ट करत ‘संभाजी नव्हे, तर मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे. (Kishor Kadam's demand to arrest Sambhaji Bhide)

अमरावती येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अनुद्‌गार काढले होते. त्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. २९ जुलै) विधानसभेत संताप व्यक्त करत भिडे यांच्या अटकेची मागणी केली हेाती. चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. त्याचे पडसाद राज्यात उमटत आहे. अगदी कवी, अभिनेत्याकडूनही भिडेंचा समाचार घेण्यात येत आहे.

Sambhaji Bhide-Kishor Kadam
Nanar Refinery Project : कोकणातील रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानात?; आशिष शेलारांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप

किशोर कदम यांनी फेसबुक पोस्ट करत भिडेंच्या अटकेची मागणी केली आहे. पोस्टमध्ये कवी सौमित्र यांनी म्हटले आहे की, अजित पवारांना (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना बोलतं करून अजित पवारांना हतबल करत राहणं हा राजकारणाचा भाग आहे. आपण सगळेच या राजकारणामुळे कोंडीत सापडलो आहोत.

Sambhaji Bhide-Kishor Kadam
Solapur Politic's : सोलापूरचे भाजप खासदार महास्वामींना जात पडताळणी समितीची नोटीस; निवडणुकीच्या तोंडावर अडचणी वाढणार

आता हा मुद्दा शिंदेजी आणि अजितजी कसे हाताळतात, हा नसून माननीय फडणवीसजी (Devendra Fadnavis) या दोघांची मजा बघत बसणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. तसं नसेल तर तत्काळ संभाजी नव्हे, मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी, अशी मी एक कलावंत म्हणून मागणी करीत आहे. किशोर कदम सौमित्र, अशी पोस्ट कवी सौमित्र यांनी लिहिली आहे.

Sambhaji Bhide-Kishor Kadam
Maharashtra Politic's : काँग्रेस-भाजपला मिळणार नवे प्रभारी; रवींना वगळले, तर पाटलांचा भार कमी करण्याचा निर्णय

दरम्यान, समाजात अशांतता तयार करण्याचं काम संभाजी भिडे का करत आहेत. अशी वक्तव्य करूनही त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? संभाजी भिडे यांना एवढी मुभा का आहे? भिडे यांना २४ तासांत अटक झाली पाहिजे, नाहीतर अधिक तीव्रपणे आंदोलन करू, असा इशारा आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com