Maharashtra BJP Politics News : नागपूरचा दबदबा वाढला

Bjp News : भाजपशासित (Bjp) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही जीएसटी हटविण्याच्या किंवा कमी करण्याच्या मागणीचा पुरस्कार करून गडकरींकडून करण्यात आलेली मागणी रास्त ठरविली.
nitin Gadkari news
nitin Gadkari news Sarakarnama
Published on
Updated on

Bjp News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांच्यावर भाजप महत्त्वाची जबाबदारी सोपविणार अशी कुजबुज काही वर्तुळात चालली आहे. गडकरी यांचे केंद्र सरकारमध्ये वजन वाढले असल्याचे संकेत दिल्लीत झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीने दिले.

आयुर्विमा तसेच वैद्यकीय विम्याच्या प्रीमियमवर आकारला जाणारा 18 टक्के जीएसटी हटविण्याची मागणीचे निवेदन नागपूरच्या आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघाने गडकरी यांच्याकडे केले होते. (Maharashtra BJP Politics News)

गडकरी यांनी ते निवेदन अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांच्याकडे पाठविले केले. त्याला सव्वा महिना लोटून गेल्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्या मागणीला थंड प्रतिसाद दिला, अशी दिल्लीतील राजकीय वर्तुळाची धारणा झाली होती. पण या मागणीची दखल घेत जीएसटी परिषदेला त्यावर विचार करण्यासाठी विशेष मंत्रिगट स्थापन करावा लागला.

भाजपशासित (Bjp) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही जीएसटी हटविण्याच्या किंवा कमी करण्याच्या मागणीचा पुरस्कार करून गडकरींकडून करण्यात आलेली मागणी रास्त ठरविली. मंत्रिगटाचा अहवाल ऑक्टोबरअखेर येऊन नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या तो विचारात घेण्यात येईल.

nitin Gadkari news
Sharad Pawar : "साहेब, आता तुम्हीच आमचा आधारवड..."; शरद पवारांचा आडम मास्तरांना मोठा शब्द

त्यावेळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असेल. गडकरींना महाराष्ट्रात भाजपकडून जबाबदारी सोपविली जाते किंवा नाही, हे येणाऱ्या काळात दिसेलच. पण सर्वसामान्यांच्या मनातले बोल ऐकवून केंद्राला त्यानुसार निर्णय घ्यायला भाग पाडल्याचे श्रेय मिळाल्यामुळे दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचा दबदबा वाढला यात शंका नाही.

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५

nitin Gadkari news
MVA News : 'मविआ'चे मुंबईचे जागावाटप जवळपास फायनल; राज्यातील जागांसाठी आजपासून सलग तीन दिवस जोर'बैठका'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com