Sarkarnama Vishesh : मंत्रिपद जाण्याच्या चर्चा सुरु असतानाच सत्तारांचे नवे प्रकरण: स्वत:च बोलून फसले, 'पीए'चा प्रताप...

Abdul Sattar PA Gavali Case : अकोल्यातील कृषी विभागाची कारवाई वादात...
Abdul Sattar, Deepak Gawli News
Abdul Sattar, Deepak Gawli NewsSarkarnama
Published on
Updated on

Abdul Sattar PA Akola News : समाधानकारक काम न केलेल्या शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळामधून वगळा, असा आदेश भाजपश्रेष्ठींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. असे असतानाच राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार पुन्हा वादात सापडले आहेत.

बोगस बियाणे आणि खतांची विक्री रोखण्यांचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. यासाठी अकोल्यात (Akola) कृषी विभागाच्या पथकाने व्यापाऱ्यांवर धाडीही टाकल्या. मात्र, या पथकावरुन आता वाद सुरु झाला आहे. ही धाड अकोला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकली होती. मात्र, यामध्ये काही खासगी लोक सहभागी असल्यामुळे आरोप होत आहेत.

मंत्री सत्तारांच्या दौऱ्यात दिसणारे दीपक गवळी सुद्दा या पथकात दिसले. सत्तारांसोबत छत्रपती संभाजीनगर आणि त्यांच्या मतदारसंघातील सिल्लोडमध्ये दिसणाऱ्या काही व्यक्ती दिसल्या. या पथकाने पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार अकोल्याच्या एमआयडीसी पोलिस स्टेशनला देण्यात आली. त्यामुळे विरोधकांची सत्तारांवर टिकेची झोत उठवत राजीनाम्याची मागणी केली. यानंतर सत्तारांनी दिपक गवळी हा आपला पीए नसल्याचा दावा केला आहे.

Abdul Sattar, Deepak Gawli News
Maharashtra Sadan Scam : न्यायालयाने सुनावले ईडीला खडे बोल, दिली अखेरची मुदत; महाराष्ट्र सदन प्रकरणी..

अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) खुलासा करताना सांगितले, दीपक गवळी माझा स्विय सहायक नाही आहे. तो कृषी विभागाचा (Agriculture Department) अधिकारी आहे. मात्र, गवळी अकोल्यातील सत्तारांच्या दौऱ्यात त्यांच्या आजूबाजूलाच फिरताना दिसत होते. गवळी हे शिल्लोडला कृषी अधिकारी होते. तसेच जिल्हा परिषदेमध्ये मोहीम विभागात होते. त्यानंतर ते सत्तार यांचे स्विय सहायक म्हणून काम पाहत आहेत, ही बाबा उघड झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने २१ मेला सत्तारांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये गवळींचा उल्लेख कृषी अधिकारी नव्हे, तर कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचे स्वीय सहाय्यक असा करण्यात आला आहे. त्यामुळे २१ मेपर्यंत गवळी हे सत्तारांचे पीए होते. सरकार कागद पत्रांमध्येच तशी नोंद आहे.

तक्रारीत काय म्हटले?

या धाडीप्रकरणी अकोल्यातील सर्व स्टाॅकीस्ट एकत्र आले असून, त्यांनी एमआयडीसी पोलीस (Police) स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यामध्ये तपासणी टीमसोबत असलेल्या खाजगी व्यक्तींविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. बी-बियाणे, किटकनाशके व खतांच्या गोदांमाची कृषी विभागामार्फत नियमित तपासण्या केल्या जातात. मात्र, बुधवारी गोदामांवर तपासणी मोहीम केली. यात कृषी विभागाचे काही अधिकारी व हितेश भट्टड, दीपक गवळी, दीपक राजपूत, भिमराव कुळकर्णी, श्रीराम महाजन हे व्यक्ती होते. त्यांनी गोदामाची तपासणी करायची आहे, असे सांगितले. त्यांना सर्व सहकार्यही केले.

Abdul Sattar, Deepak Gawli News
Chandrashekhar Bawankule News : चंद्रशेखर बावनकुळेंनी हलके केले शिंदेंच्या मंत्र्यांचे टेन्शन; मंत्र्यांबाबतच्या निर्णयावर म्हणाले...

मात्र, यादरम्यान कृषी विभागाशी काहीही संबंध नसलेल्या वरील खाजगी व्यक्तींनी आम्हाला धमकावले. अश्लिल शिविगाळ केली. याबाबत उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी हे व्यक्ती आमचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले. हे खाजगी व्यक्तीच इतर अधिकाऱ्यांना सूचना व निर्देश देत होते. या खाजगी व्यक्तींना गोदामात बेकायदेशीर कसे आले, असे विचारले असता त्यांनी आमच्या मालाची नासधूस केली व काही उत्पादनांना लाथा मारल्या.

या दरम्यान, अंगावर येत मारण्याचाही प्रयत्न केला. आताच्या आता पाच लाख रुपये द्या, सोडून देतो, असेही धमकावले. हे सर्व होत असताना कृषी विभागाचे अधिकारी मात्र काहीच मज्जाव करीत नव्हते. त्यामुळे आम्ही अत्यंत भयभीत झालो. या व्यक्तींकडून जिवित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत केली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com