बबनदादांचं ठरेना; फडणवीसांना भेटलेले आमदार शिंदे जयंत पाटलांच्या दौऱ्यातही सहभागी!

सोलापुरात येताच ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचे दर्शन घेतले. त्यावेळीही आमदार बबनदादा हे जयंतरावांच्या सोबत होते.
Babanrao Shinde-Jayant Patil
Babanrao Shinde-Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : दिल्लीत महाराष्ट्र भवनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जाऊन भेटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे (Baban Shinde) हे आज (ता. १२ ऑगस्ट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सोलापूर (Solapur)दौऱ्यात सहभागी झाले होते, त्यामुळे बबनदादांचे भाजप (BJP) प्रवेशाचे अजून ठरेना की काय? अशी चर्चा त्यांच्या उपस्थितीमुळे रंगली होती. (MLA Babanrao Shinde also participated in Jayant Patil's visit to Solapur)

एमआयएमचे माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह सहा माजी नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम रात्री असल्याने तसेच श्रावण महिना सुरू असल्याने प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सोलापुरात येताच ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचे दर्शन घेतले. त्यावेळीही आमदार बबनदादा हे जयंतरावांच्या सोबत होते.

Babanrao Shinde-Jayant Patil
MIMच्या सहा माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश; सत्ता गेल्यानंतरही तौफिक शेख यांनी शब्द पाळला

काही दिवसांपूर्वी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी दिल्लीत जाऊन फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर राज्याच्या राजकाणात विशेषतः सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यांची ही भेट माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी आमदार शिंदे यांनी फडणवीस यांच्या भेटीवर नो कॉन्मेटस असे उत्तर दिले होते. दुसरीकडे माजी आमदार राजन पाटील यांनी आमचा भाजप प्रवेश झाला तर तुम्हाला कळेलच. पण आमची श्रद्धा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर असल्याचे सांगितले होते. बबनदादांनीही भाजपत प्रवेश करण्याचा प्रश्न येत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतरही या दोघांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात सुरूच आहे.

Babanrao Shinde-Jayant Patil
अमृता फडणवीसांविषयी आक्षेपार्ह कमेंट करणे आलं अंगलट; जुन्नरमधील तरुणास अटक

दरम्यान, सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले जयंत पाटील यांच्याबरोबर आज आमदार बबनराव शिंदे हेही सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची रंगलेल्या चर्चेला पुन्हा उजाळा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी आमदार शिंदे यांना ईडीची नोटीस आली होती, त्याचे उत्तरही त्यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र, त्या नोटीशीमुळेच ते भाजप प्रवेश करतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे. तर आता भाजपत प्रवेश केला पक्षांतरबंदी कायदा लागू होऊन पुढची निवडणूक लढविण्यास ते अपात्र ठरू शकतात, त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश रंगल्याचेही सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com