खासदार लोखंडे यांचा एकदा नव्हे तर चौथ्यांदा नवा घरोबा!

सदाशिवराव लोखंडे (Sadashivrao Lokhande) हे राज्यातील `लकी` नेत्यांपैकी एक ओळखले जातात...
Eknath Shinde and MP Krupal Tumane
Eknath Shinde and MP Krupal TumaneSarkarnama

शिर्डी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे बारा खासदार आपल्या गटात घेतल्यानंतर सेनेला धक्का आहे. मात्र जी खासदार मंडळी त्यांच्यासोबत आहेत त्यातील काहींना पक्षांतराचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी या राजकीय घडामोडी नवीन नाहीत.

त्यात शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांचे नाव अग्रभागी राहील. अतिशय सहजपणे दोन वेळा खासदार झालेले लोखंडे ही नशीबवान नेते समजले जातात. मुंबईत राहून ते कर्जत-जामखेडचे भाजपकडून तीन वेळा आमदार झाले. पाच वर्षे विश्रांती घेतल्यानंतर ते 2014 पासून आता शिर्डीचे खासदार आहेत. त्यांना 2009 मध्ये भाजपने विधानसभेची संधी नाकारल्यानंतर ते मनसेत गेले. 2014 मध्ये अचानक शिर्डीतून खासदार म्हणून लढण्याची संधी आली. ते मग शिवसेनेत आले. आता शिवसेनेच्या फुटीर गटात सहभागी झाले आहेत. आता हे सारे खासदार आपण त्याच पक्षात म्हणजे शिवसेनेेत असल्याचा दावा करत असले तरी त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून नवीन घरोब केल्याचे दिसून येत आहे.

भाजपसोबत जाणे इष्ट ठरेल, आपण निर्णय घ्यावा, अशी मागणी आम्ही बारा खासदारांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंकडे केली असल्याचे सूचक विधान, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मागील आठवड्यात केले होते. त्याचे प्रत्यंतर लगेच आले. त्यांच्यासह या बारा खासदारांनी वेगळी चूल मांडली आणि भाजपसोबत असलेल्या शिंदे गटासोबत जाणे पसंत केले. याचा अर्थ असा की येत्या लोकसभा निवडणुकीत लोखंडे हे भाजप प्रणित उमेदवार असतील.

Eknath Shinde and MP Krupal Tumane
धनुष्यबाण मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे यांना गाठायचाय 188 चा आकडा!

मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत त्यांना मोदी लाटेचा फायदा झाला. मतदारसंघात शिवसेनेचा एकही आमदार नसताना ते दोनवेळा विजयी झाले. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना ऐनवेळी मोठी रसद पुरविली. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदानापूर्वीच्या दोन-तीन दिवसांत उत्तर नगर जिल्ह्यातील त्यांची यंत्रणा सक्रीय केली. निळवंडे धरणाच्या प्रश्नावर दुष्काळी टापूची साथ मिळाली. मात्र, अकोले तालुका वगळता त्यांना संगमनेर आणि नेवासे तालुक्यासह सर्वत्र आघाडी मिळाली होती. आपल्याला मोदी लाटेचा फायदा झाला ही भावना या सर्व बारा खासदारांच्या मनात आहे, असे लोखंडे यांनी मागील आठवड्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यावरून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट झाली होती.

Eknath Shinde and MP Krupal Tumane
ठाकरे गटात चिंतेचे वातावरण; CM एकनाथ शिंदे खासदार गजानन किर्तीकरांच्या भेटीला

या घडामोडी घडत असताना भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीची महत्वाची बैठक शिर्डीत घेतली. या बैठकीस संघटनात्मक पातळीवर कार्यरत असलेले भाजपचे वरिष्ठ पातळीवर नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. या बैठकीत बोलण्याच्या ओघात एका वरिष्ठ नेत्यांनी लोखंडे हे भाजपच्या विचाराचे असल्याचे विधान केले होते. तर त्यास प्रतिसाद देत विखे पाटील यांनी पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ असे जाहीरपणे सांगितले होते.
मुळात लोखंडे हे खरोखरीच भाजपच्या विचाराचे आहेत. जनसंघाचे दिवंगत नेते हशू अडवाणी हे त्यांचे गुरू. कर्जत-जामखेड मतदारसंघात ते भाजपचे तीन वेळा आमदार होते. स्व. प्रमोद महाजन यांनी त्यांना उमेदवारी दिली. त्यावेळी भाजपची राज्यात तुलनेत कमी ताकद होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबत त्यांनी एकेकाळी भाजप विस्ताराचे काम केले. त्यानंतर मनसे व्हाया शिवसेना ते आता शिंदे गट असा त्यांचा प्रवास झाला.

Eknath Shinde and MP Krupal Tumane
शिंदे-फडणवीस सरकार येण्याची पायाभरणी करणारा नेता आज त्यांना भेटला...

बदलत्या भूमिकांचा मागोवा
आपण काय छोटी माणसे, मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळते. त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींवर लगेचच काही बोलणे योग्य नाही. असा सावध पवित्रा सुरवातीला लोखंडे यांनी घेतला. त्यानंतर मात्र आम्ही बारा खासदारांनी पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेऊन भाजपसोबत जाण्याचा सल्ला त्यांना दिला. काय ते त्यांच्या समोर बोलू, माध्यमांसमोर बोलणार नाही, अशी भूमिका त्यांनी दहा दिवसांपूर्वी शिर्डी घेतली होती.
त्यांच्या या दोन्ही भूमिकांचे विश्लेषण करणा-या बातम्या सकाळने दिल्या होत्या. तो अंदाज आज खरा ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com