महाराष्ट्र काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; प्रदेशाध्यक्षपदासाठी या नेत्यांची नावे चर्चेत!

येत्या १९ सप्टेंबर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी उलटफेर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Sunil Kedar-Satej Patil-Yashomati Thakur
Sunil Kedar-Satej Patil-Yashomati ThakurSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : काँग्रेसमध्ये (Congress) राष्ट्रीय पातळीप्रमाणेच राज्याच्या संघटनेतही फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण, येत्या १९ सप्टेंबर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी उलटफेर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि माजी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) हे शर्यतीत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Names of Yashomati Thakur, Satej Patil, Sunil Kedar are in discussion for the post of Congress state president)

Sunil Kedar-Satej Patil-Yashomati Thakur
पवारांचे निष्ठावंत बबनदादा, सोपल, राजन पाटलांचं नक्की काय ठरलंय!

राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानुसार काही महत्वाचे नेते काम करीत आहेत. नव्या अध्यक्षानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र काँग्रेसमध्येही फेरबदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये काँग्रेसला नवे प्रदेशाध्यक्षही मिळणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधींची येत्या १९ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होणार आहे. त्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदासह संघटनेतील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना बदलण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच, राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. काही महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

Sunil Kedar-Satej Patil-Yashomati Thakur
मुख्यमंत्र्यांचा सावंत, शहाजीबापूंना ‘कोल्ड शॉक’; माढा, सांगोल्याची जबाबदारी दिली आपल्या खास व्यक्तीकडे

याच प्रदेश प्रतिनिधींच्या बैठकीत काँग्रेसला नवे प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रतिनिधी आपले म्हणणे या बैठकीत सादर करतील आणि नवे प्रदेशाध्यक्ष कोण व्हावेत, यावर चर्चा होईल. प्रदेशाध्यक्षपदासाठीचा प्रस्ताव दिल्लीतील काँग्रेस हायकमांडे पाठविला जाईल, त्यानंतर महाराष्ट्राला नवे प्रदेशाध्यक्ष मिळतील, असे म्हटले जात आहे.

Sunil Kedar-Satej Patil-Yashomati Thakur
राष्ट्रवादीच्या कल्याणराव काळेंची पाऊले शिंदे गटाकडे?; कट्टर समर्थकाची सहसंपर्कप्रमुखपदी वर्णी

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री आणि राहुल ब्रिगेडमधील महत्वाचा चेहरा असलेल्या यशोमती ठाकूर यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच, विदर्भातील महत्वाचे नेते असलेले सुनील केदार यांचेही नाव चर्चेत आहेत. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस टिकवून ठेवणारे माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील हे शर्यतीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com