NCP's Lok Sabha Preparations : राष्ट्रवादीच्या 'मिशन लोकसभे'ला प्रारंभ; शरद पवार घेणार मतदारसंघनिहाय आढावा

NCP News: स्वतः पवार हे मतदारसंघातील पक्षाची स्थिती, संभाव्य उमेदवार आणि जिंकून येण्याची क्षमता याची चाचपणी करण्याची शक्यता आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने तयारीला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः उद्यापासून मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत. एकीकडे महाविकास आघाडीत जागावाटपचा चर्चा सुरू असताना आघाडीतील तीनही पक्षांनी बैठक घेऊन वातावरण तापवयाला सुरुवात केली आहे. (NCP will conduct election review of Lok Sabha constituency from tomorrow)

कर्नाटक विधानसभेतील काँग्रेसच्या विजयानंतर विरोधी पक्षांना बळ आले. लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) एकत्र लढण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात विरोधातील महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेऊन जागावाटपाबाबत चर्चाही सुरू केली आहे. कोणी किती जागा लढवाव्यात, याची प्राथमिक चर्चाही केली आहे. त्यानंतर प्रथम शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मातोश्रीवर मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेतला.

Sharad Pawar
Martand Devsthan Jejuri : जेजुरीत बाहेरच्या विश्वस्तांचा अट्टहास कोणाचा आणि कुणाच्या आशीर्वादाने?; माजी मंत्र्याची शिफारसही डावलली

शिवसेनेने आढावा बैठक घेताना संबंधित मतदारसंघातून कोण जोरदार टक्कर देऊ शकतो, त्याबाबची उमेदवारांची चाचपणी केली आहे. शिवसेनेच्या पातळीवर काही नावांची चर्चाही झाली आहे. शिवसेनेनंतर काँग्रेस पक्षानेही आपल्या नेत्यांची आणि जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली आहे. त्या काँग्रेसच्या वाट्याला कोणते मतदारसंघ येऊ शकतात, याची वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याचे समजते.

Sharad Pawar
Dimbhe Dam Water Issue : डिंभे धरणाचे पाणी पळविल्यास सर्वप्रथम मी अन्‌ आमदार बेनके जेलमध्ये जाऊ : दिलीप वळसे पाटील यांचा इशारा

आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. उद्या (ता. ३० मे) आणि परवा (ता. ३१ मे) मतदारसंघनिहाय लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने आढाव घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. स्वतः पवार हे मतदारसंघातील पक्षाची स्थिती, संभाव्य उमेदवार आणि जिंकून येण्याची क्षमता याची चाचपणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची उद्यापासून होणारी बैठक महत्वाची मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com