Karnataka Election Result 2023 : ना शरद पवार ना राज ठाकरे; सीमाभागात कुणाचाच करिश्मा नाही, महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा

Maharashtra Ekikaran Samiti : निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव
Karnataka Election
Karnataka ElectionSarkarnama

Karnataka Assembly Election Result 2023 : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागातील बेळगाव जिल्ह्यातील सहा मतदारसंघात मराठी भाषकांची मोठी संख्या आहे. या सहाही मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने (मएस) आपले उमेदवार दिले होते. या मतदारसंघात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र सीमावर्ती भागातही महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडाला आहे.

Karnataka Election
Ashok Chavan In Karnataka campaigning News : सहा मतदारसंघात सभा, तीन ठिकाणी विजय ; अशोक चव्हाणांना `फिप्टी-फिप्टी` यश...

महाराष्ट्र सरकारने (Maharashtra) सीमाभागातील जनतेसाठी आरोग्य योजना लागू केली होती. त्यामुळे कर्नाटकच्या भाजप सरकराने टीका केली होती. कर्नाटक काँग्रेसनेही या प्रकाराकडे केंद्राने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले होते. हा मुद्दा महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये चांगलाच गाजला होता.

कर्नाटक (Karnataka) निवडणुकीत या सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, निपाणी, यमकनर्डी, खानापूर या सहा मतदारसंघात 'मएस' पक्षाने उमेदवार दिला. निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला होता. दरम्यान, सीमाभागातील सहा मतदारसंघात उमेदवार देताना 'मएस'च्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती.

Karnataka Election
Karnataka Women MLA : कर्नाटकच्या २२४ आमदारांच्या विधानसभेत पोचल्या अवघ्या दहा जणी!

सीमाभागात 'मएस'च्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjayt Raut) यांनी सभा घेतल्या. मराठी जनतेने 'मएस'च्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सोशल मीडियातून सीमाभागातील मराठी लोकांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही 'मएस'च्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निपाणीतील उमेदवारासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनीही प्रचारसभा घेतली होती. 'मएस'च्या नेत्यांनीही प्रचाराची राळ उठविली होती. असे असतानाही 'मएस'च्या एकाही उमेदवाराला यश मिळलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचाही पराभव झाला आहे.

Karnataka Election
Karnataka Election Result: कर्नाटकच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस अन् 'जेडीएस'च्या 'या' बड्या नेत्यांचा पराभव

महाराष्ट्र एकीकरण समितीचे पराभूत उमेदवार

बेळगाव दक्षिण - रमाकांत कोंडुरकर

बेळगाव उत्तर - अमर येळ्ळूरकर

बेळगाव ग्रामीण - आर. एम. चौगुले

निपाणी - जयराम मिरजकर

यमकनर्डी - मारुती नाईक

खानापूर - मुरलीधर पाटील

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com