Anil Kadam Politics: अनिल कदम यांच्या मार्गात यंदाही भाऊबंदकीचा अडसर?

Niphad constituency Anil Kadam Shivsena : निफाड मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? हे शरद पवार ठरवतील. उमेदवारीसाठी ठाकरे गटातील माजी आमदार अनिल कदम हे मुख्य दावेदार असणार आहेत.
Anil Kadam
Anil Kadam sarkarnama
Published on
Updated on

Anil Kadam News : निफाड मतदारसंघात यंदा अधिक चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यात भाऊबंदकी हा मुख्य घटक असेल. त्यामुळे ही निवडणूक अतिशय अवघड बनण्याची शक्यता आहे. निफाड मतदारसंघात गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर विजयी झाले.

बनकर यांनी तत्कालीन शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांचा पराभव केला. आमदार बनकर जेवढ्या मतांनी विजयी झाले तेवढी मते माजी आमदार अनिल कदम यांचे बंधू यतीन कदम यांना मिळाली होती.

भाऊबंदकीने कदम यांना आमदारकी पासून रोखले. ही भाऊबंदकी थांबविण्याचे सामंजस्य यतीन कदम दाखविणार का? याचे उत्तर अस्पष्ट आहे. किंबहुना माजी आमदार कदम यांच्या विरोधकांकडून या भाऊबंदकीला खतपाणी कसे मिळेल, असे जोरदार प्रयत्न पडद्यामागून होत आहेत. त्यामुळे यंदा त्यात काय बदल होतो याला खूप महत्त्व असेल.

आमदार बनकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडली ते भाजपच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात गेले. त्यांचा हा निर्णय मतदारांना मान्य आहे का? हे या निवडणुकीत होणाऱ्या मतदानातून दिसेल.

Anil Kadam
Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीसमोर जागावाटपाचा पेच; अनेक मतदारसंघावर घटक पक्षांनी ठोकला दावा

आमदार बनकर हे अजित पवार गटाचे अर्थात महायुतीचे उमेदवार असतील. आमदार बनकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे माजी आमदार कदम असा सामना होईल. या सामन्याला ओझर परिसरातून भाजपचे यतीन कदम उमेदवारी करून अपशकुन करू शकतात. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनीही उमेदवारी मागितली आहे.

उमेदवारी न मिळाल्यास क्षीरसागर यांचा अपक्ष उमेदवारी म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यावर ठाम आहेत. अशा स्थितीत ही लढत चौरंगी होऊ शकेल. त्यात कोण किती मतदारांना आपलेसे करतो तो निफाडचा आमदार असेल.

निफाड मतदारसंघात यंदाही शरद पवार हा फॅक्टर सर्वाधिक प्रबळ असेल. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? हे शरद पवार हेच ठरवतील. त्या दृष्टीने सध्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल कदम यांची गाडी जोरात आहे. माजी आमदार कदम यांच्या विषयी मतदारांमध्येही अनुकूल वातावरण आहे, असे बोलले जाते. अशा स्थितीत त्यांच्या मार्गात कोणते राजकीय अडथळे उभे करावे यासाठी विरोधक मनापासून कामाला लागले आहेत.

त्यात कदम विरोधकांच्या हाती पुन्हा एकदा भाऊबंदकीचे शस्त्र पडेल, अशी चिन्हे आहेत. तसे झाल्यास अनिल कदम यांना राजकीय विरोधकांपेक्षा भाऊबंदकीचा तिढा कसा सोडवावा हीच डोकेदुखी ठरू शकेल.

(Edited By Roshan More)

Anil Kadam
Rahul Gandhi : अमित शाह यांच्यावरील टिप्पणी राहुल गांधींना भोवणार; कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com