सोलापूर : पंढरपूरमध्ये (Pandharpur) ज्या परंपरा आहेत. जी मठं आणि मंदिरं आहेत, ती संरक्षित ठेवून वारकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा देणारा अत्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा कॉरिडॉर (Corridor) पंढरपुरात करण्यात येईल. त्यामुळे यासंदर्भात जे अफवा पसरवत आहेत, त्यांना हात जोडून विनंती आहे की, सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांची मते जाणून घेऊनच पंढरपूर कॉरिडॉरचे काम करण्यात येईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सोलापुरात (Solapur) बोलताना स्पष्ट केले. (Pandharpur Corridor will be made by keeping temples and monasteries protected : Devendra Fadnavis)
सोलापुरात आज (ता. ११ डिसेंबर) गुरव समाजाच्या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह खासदार, आमदार या अधिवेशनाला उपस्थित होते. त्या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी पंढरपूर कॉरिडॉरबाबत भाष्य केले.
सोलापूर ही अध्यात्मिक नगरी आहे. एकीकडे सिद्धरामेश्वर आहेत. पंढरपूरला विठ्ठलाचे मंदिर आहे. अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत, त्यामुळे सोलापूर परिसर हा श्रद्धेचा भाग आहे. मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरचा विकास करण्याचे (कॉरिडॉर) घोषित केले. त्यानंतर काही लोकांनी त्यासंदर्भात वाद तयार केला आहे. मी त्याही लोकांना सांगू इच्छितो की, पंढरपूरचा कॉरिडॉर कोणाला उद्ध्वस्त करून आपल्याला करायचा नाही, तर हा कॉरिडॉर आपल्याला सर्वांना सोबत घेऊन करायचा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
पंढरपूर कॉरिडॉरमध्ये पाचशे घरं तोडून टाकणार. मठ आणि मंदिरं पाडणार, असा अपप्रचार करण्यात येत आहे. मात्र, अशा प्रकारचा कुठलाही कॉरिडॉर आम्ही करणार नाही. पंढरपूरमध्ये ज्या परंपरा आहेत, जी मठं आणि मंदिरं आहेत, ती संरक्षित ठेवून त्या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा कशा निर्माण करता येतील. यासाठी अत्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा कॉरिडॉर पंढरपुरात करण्यात येईल. त्यामुळे यासंदर्भात जे अफवा पसरवत आहेत, त्यांना हात जोडून विनंती आहे. सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांची मते जाणून घेऊनच पंढरपूर कॉरिडॉरचे काम आम्ही करू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.