दोघांचे आयुष्य वाचवणाऱ्या १३ वर्षीय आयुषची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी शिफारस

आयुषचे धाडस आणि प्रसंगावधानतेची पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) तत्परतेने दखल घेत त्याला हा (National Bravery Award) पुरस्कार देण्यात यावा म्हणून शिफारस करायचे ठरवले आहे.
PCMC Mayor Usha Dhore
PCMC Mayor Usha DhoreSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : आपला जीव धोक्यात घालून तलावात बुडणाऱ्या तीन मुलांना मोठ्या धाडसाने वाचविणाऱ्या आयुष तापकीर या १३ वर्षीय शाळकरी (13 Year Old School Boy) मुलाला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार (National Bravery Award) मिळावा म्हणून पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी प्रस्ताव तयार केला आहे. यापाठोपाठ आयुषचे धाडस आणि प्रसंगावधानतेची पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिकेनेही तत्परतेने दखल घेत त्याला हा पुरस्कार देण्यात यावा म्हणून शिफारस करायचे ठरवले आहे.

PCMC Mayor Usha Dhore
तिघांचे प्राण वाचवणाऱ्या १३ वर्षीय आयुषचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले कौतुक

आयुषने भोसरीतील सदगुरुनगर येथे तलावात बुडणाऱ्या तीन मुलांना काल (ता.२८ सप्टेंबर) मोठ्या शौर्याने आपला जीव धोक्यात टाकत पाण्याबाहेर काढले होते. त्यामुळे दोघांचा जीव वाचला. त्याच्या या धाडसाची कालच दखल घेत पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी त्याचा प्रशस्तीपत्र, बक्षीस आणि मिठाई देऊन सत्कार केला होता. त्याची त्यांनी राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळण्यासाठी शिफारसच केली नाही, तर तसा प्रस्तावच तयार केला आहे. दरम्यान, दोन मुलांना नव्याने आयुष्य देणाऱ्या आयुषच्या या कौतुकास्पद कामगिरीची आज पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही दखल घेतली. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते महापौर कक्षात त्याचा सत्कार करण्यात आला.

PCMC Mayor Usha Dhore
लाचलुचपतची कारवाई होऊनही PCMC स्थायी समितीत दोन `मलईदार प्रस्ताव `

यावेळी जैव विविधता व व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे, माजी स्थायी सभापती संतोष अण्णा लोंढे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, आयुषचे वडील गणेश तसेच, त्याची आई व नातेवाईक उपस्थित होते. आयुषच्या कामगिरीची दखल घेऊन त्याची बाल शौर्य पुरस्कारासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करण्यात येणार आहे. असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. आयुषने तिसऱ्या वर्षापासूनच जलतरणाचे धडे घेतले आहेत. त्याला घोडेस्वारी व कुस्तीचीहीआवड आहे. कुस्तीमध्ये त्याला २ सन्मानचिन्ह व २ पदके मिळालेली आहेत. यानंतर स्थायी समितीचे सभापती तथा अध्यक्ष नितीन लांडगे यांनी भारतरत्न स्व. माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक भेट देऊन आपल्या दालनात आयुषचा सन्मान केला. यावेळी त्याने मोठे झाल्यावर पोलिस खात्यात जाणार असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com