बचत गटापासून सुरु झालेला चाकणकरांचा प्रवास महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत येवून पोहोचलाय...

सुप्रिया सुळे (Supriya sule) या 2009 ला बारामती (Baramati Loksabha) मतदारसंघाच्या खासदार झाल्यानंतर चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद देण्यात आले.
Rupali Chakankar
Rupali Chakankar sarkarnama

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने जारी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पक्षातील आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर होणाऱ्या प्रत्येक टीकेला परतवून लावण्यापासून ते रस्त्यावरची आंदोलने आणि हजारोंच्या गर्दीत विषयांची मुद्देसूद मांडणी करत भव्य व्यासपीठ गाजवण्यासाठी देखील त्या प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासाची सुरुवात झाली होती ती बचत गटांपासून.

Rupali Chakankar
रुपाली चाकणकर होणार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा

दौंडमधील (Daund) शेतकरी कुटुंबात रुपाली चाकणकर यांचा जन्म झाला. रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले आणि पुढे अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. पण लग्नानंतर त्यांचा करिअरला कलाटणी मिळाली. लग्नानंतर सासरकडील चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही आपसूकच राजकीय प्रवेश झाला. 2002 ते 2007 या कालावधीमध्ये त्यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर नगरसेविका होत्या. त्यांच्या माध्यमातूनच रुपाली यांनी बचत गटांच्या कामाला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात बचत गट स्थापन करुन त्यांनी महिलांचे संघटन करण्यास सुरूवात केली.

Rupali Chakankar
घरात नाही दाणा पण मला 'वॅक्सिन गुरू' म्हणा...रुपाली चाकणकरांचा मोदींवर निशाणा

2009 ला सुप्रिया सुळे (Supriya sule) बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाच्या खासदार झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे पुणे शहराध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्षपद आणि आता हा प्रवास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदापर्यंत येवून पोहोचलाय.

पुणे शहराध्यक्ष असताना 2017 नंतर सत्ताधरी भाजपविरोधात आंदोलन करताना रुपाली चाकणकर अधिक आक्रमक चेहरा म्हणून त्या समोर आल्या. आजही या आंदोलनाचे 12 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. यात खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर महागाईविरोधात केलेले आंदोलन असो कि तानाजी सावंत यांच्या घरी जाऊन खेकडे सोडण्याचे आंदोलन असो. त्यावेळी खेकड्यांनी धरण फोडले हे तानाजी सावंत यांचे वक्तव्य चांगलेच गाजले होते. त्यावेळी खेकड्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चाकणकर यांनी केली होती. जलपर्णी घोटाळ्याचा आरोप करत त्यांनी तत्कालीन महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात जलपर्णी घेऊन जात आंदोलन केले होते.

2019 ची विधानसभा निवडणूक खडकवासला मतदारसंघातून लढवण्यासाठी चाकणकर उत्सुक होत्या. त्यासाठी त्यांनी पक्षाकडे अर्ज देखील दिला होता. मात्र मुलाखतीच्या एक दिवस आधीच पक्षाच्या तत्कालिन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पक्ष सोडला. त्यामुळे 24 तासांतच चाकणकर यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार त्यांनी सोडून दिला आणि महिला संघटनेसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात दौरे सुरु केले. अखेरीस आज त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com