राहुल, इथंपण तू आडवा का मला? : अजितदादांनी घेतली आमदार कुलांची फिरकी!

आमदार राहुल कुल हे एकेकाळी पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओखळले जात होते. मात्र, २०१९ मध्ये त्यांच्या धर्मपत्नी कांचन कुल यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत उतरत आव्हान दिले होते.
Ajit Pawar-Rahul Kul
Ajit Pawar-Rahul KulMaharashtra vidhanmandal

मुंबई : ‘राहुल, इथंपण तू आडवा का मला,’ असा मिश्किल सवाल करत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भारतीय जनता पक्षाचे दौंडचे आमदार आणि एकेकाळचे निकटवर्तीय ॲड राहुल कुल (Rahul Kul) यांची फिरकी घेतली. (Rahul, are you interrupting me here too? : Ajit Pawar's question to MLA kul)

प्रश्नोत्तरांचा तास संपल्यानंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी औचित्याच्या मुद्यावर चर्चा आयोजित करण्याचा निर्णय पुकारला. औचित्याच्या मुद्यांचे १३ प्रश्न आहेत, प्रत्येकाला एकेक मिनिटे देत आपण औचित्याचा मुद्यांचे प्रश्न १५ मिनिटांत संपवू, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सांगितले. मात्र, त्यास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोध दर्शविला. पण, तोपर्यंत नार्वेकर यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यवत पोलिस ठाण्याच्या संदर्भातील प्रश्न ते विचारत होते. विरोधी पक्षनेते पवार यांचा मात्र नियमित कामकाज घेण्याचा आग्रह हेाता.

Ajit Pawar-Rahul Kul
विरोधकांच्या प्रश्नांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांची उडाली फे फे!

अजित पवार यांचा आग्रह पाहून विधानसभा अध्यक्षांच्या मदतीला अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले. ते म्हणाले की, आपण १.१५ ला विरोधी पक्षनेत्यांचे भाषण सुरू. तोपर्यंत मुख्यमंत्रीही सभागृहात येणार आहेत. त्यावरही समाधान न झाल्याने अजितदादांनी नियमित कामकाजाचा आग्रह धरला. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करत विरोधी पक्षनेत्यांचा आग्रह नियमित कामकाजाचा आहे, त्यामुळे ते आपण सुरू करूयात. मधल्या वीस मिनिटांत आपण औचित्याचे मुद्दे घेऊ, असे सांगून फडणवीस यांनी अजितदादांची मागणी मान्य केली.

Ajit Pawar-Rahul Kul
नमिता मुंदडा यांच्या प्रश्नात इंग्रजी शब्दांचाच भडीमार!

उपमुख्यमंत्री बोलत असतानाच पाठीमागून राहुल कुल यांनी विरोधी बाकाकडे पाहून खाली बसण्यासंदर्भात हाताने खूण केली. त्यानंतर अजितदादांनी उभे राहत, राहुल तिथंपण तू आडवा का मला, असा सवाल करत स्मितहास्य करून आमदार कुल यांची फिरकी घेतली. त्यानंतर नियमित कामकाजास सुरुवात झाली. त्याची एकच चर्चा सध्या पुणे जिल्ह्यासह राज्यात सुरू आहे.

Ajit Pawar-Rahul Kul
आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या, त्या दिवशी माझंही ‘राम नाम’ झालं असतं !

आमदार राहुल कुल हे एकेकाळी पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओखळले जात होते. मात्र, विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून कमळाच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती. तत्पूर्वी कुल यांच्या धर्मपत्नी कांचन कुल यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत उतरत आव्हान दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com