Rashmi Thackeray : रश्मी ठाकरेंचा महामोर्चात सहभाग अन्‌ ठाकरेंच्या 'त्या' विधानाची पुन्हा रंगली चर्चा!

पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात त्या प्रथमच सहभागी झाल्या आहेत.
Rashmi Thackeray
Rashmi ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने आज (ता. १७ डिसेंबर) काढण्यात आलेल्या महामोर्चात शिवसेना (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) सहभागी झाल्या होत्या. पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात त्या प्रथमच सहभागी झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राज्याला पहिली महिला (Women) मुख्यमंत्री (Chief Minister) देण्याबाबत सूतोवाच केले होते, त्यामुळे महामोर्चात रश्मी ठाकरे सहभागी होणे महत्वाचे ठरत आहे. त्यांच्या सहभागामुळे उद्धव ठाकरे यांच्या त्या विधानाची पुन्हा नव्याने चर्चा रंगली आहे. (Rashmi Thackeray's participation in Mahamorcha and discussion of Thackeray's that statement again)

राज्यातील महापुरुषांबाबत वारंवार अवमानकारक विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री आणि नेत्यांच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या वतीने आज मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र, रश्मी ठाकरे यांच्या सहभागाची चर्चा होत आहे.

Rashmi Thackeray
Mahavikas Aaghadi Morcha : राज्यपालांची तातडीने हकालपट्टी करा; अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल : शरद पवार कडाडले

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याच्या संदर्भात विधान केले होते. त्यावेळीही ठाकरे यांच्या मनातील ती महिला मुख्यमंत्री कोण, अशी चर्चा झाली होती. त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या महामार्चात रश्मी ठाकरे सहभागी झाल्या आहेत, त्यामुळे रश्मी ठाकरे यांचे मोर्चात सहभागी होणे महत्वाचे ठरत आहे.

Rashmi Thackeray
Kankavli News : राणेंच्या होम पिचवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपला कडवे आव्हान

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर रश्मी ठाकरे या शिवसेनेच्या काही कार्यक्रमात सहभागी होताना दिसत होत्या. मागील काळातही त्यांनी पडद्याआडून सूत्रे हलवली आहेत. मात्र, पक्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमात त्या आज प्रथमच सहभागी झाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com