मुकेश अंबानी देश सोडून लंडनमध्ये स्थायिक होणार? : रिलायन्सने केला मोठा खुलासा

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी लंडनमध्ये एक मालमत्ता विकत घेतल्याने चर्चा सुरू झाली होती.
Mukesh Ambani-Stoke Park
Mukesh Ambani-Stoke ParkSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : रिलायन्सचे उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी देश सोडला असून ते लंडनमध्ये स्थायिक झाल्याच्या चर्चा गेले काही दिवस सोशल मिडियात सुरू होत्या. अंबानी यांनी लंडन येथील स्टोक पार्क (Stoke Park) ही मालमत्ता विकत घेतल्याचे कारण देण्यात येत होते. मात्र या चर्चेनंतर रिलायन्सने खुलासा दिला आहे.

त्यात म्हटले आहे की मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब हे लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचे वृत्त हे तथ्यहिन आहे. देश सोडून लंडनमध्ये किंवा जगात इतरत्र स्थायिक होण्याचा कोणताही अंबानी यांचा विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्टोक पार्क ही वास्तू रिलायन्स इंडस्ट्रीजने विकत घेतल्याचे यात मान्य करण्यात आले आहे. मात्र ही अंबानी यांच्या वास्तव्यासाठी नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही वास्तू गोल्फ आणि इतर क्रीडाविषयक बाबींचे रिसाॅर्ट म्हणून विकसित करण्यात येणार आहे. स्थानिक नियम व अटी पाळूनच हे रिसाॅर्ट सुरू केले जाईल. रिलायन्स समूहाच्या वेगाने वाढणाऱ्या कन्झुमर बिझनेसमध्ये हे रिसाॅर्ट आता सामील झाले आहे. यामुळे भारताचा हाॅस्पॅटॅलिटी क्षेत्रातील ठसा जगभर उमटणार आहे.

ही मालमत्ता सुमारे 300 एकर क्षेत्रात असल्याचे सांगण्यात येते. याबाबत `मिड डे`ने वृत्त दिले होते. सुमारे 592 कोटी रुपये देऊन अंबानी यांनी त्याची खरेदी केली होती. या वास्तूत 49 बेडरूम असल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांची देखील सोय आहे.

Mukesh Ambani-Stoke Park
मराठी माणसालाच भाजप परप्रांतीय ठरवेल ; "अंबानी, अदानींना म्हणण्याचे धाडस नाही

अंबानी यांचा मुंबई येथे चार लाख चौरस फूटाचे अॅंटिलिया हे मोठे निवासस्थान आहे. कोरोना लाॅकडाऊनमध्ये अंबानी कुटुंबाने आपला बराच काळ गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या रिफायनरीच्या येथेच व्यतित केला होता. लाॅकडाऊन काळात या परिवाराला मोकळ अवकाश असलेल्या इमारतीची गरज वाटू लागली. त्यासाठीचा शोध सुरू झाला. त्यात स्टोक पार्कचे डिल पूर्ण झाले. त्यानंतरचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरच अंबानी देश सोडून जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. अंबानी यांच्या अॅंटिलिया निवासस्थानी स्फोटके भरून गाडी भरण्याचा प्रकार दोन वर्षांपूर्वी घडला होता. त्याचाही धसका अंबानी यांनी तर घेतला नाही ना, याचीही चर्चा सुरू झाली. पोलिस दलातील सचिन वाझेनेच तो प्रकार केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यातील गंभीरता आणखी वाढली होती. आता मात्र अंबानी यांनी भारतातच राहणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर या वादावर पडदा पडणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com