Ruby Prajapati : रिक्षा चालकाच्या लेकीची गगनभरारी ; गरिबी अन् आजारपणावर मात करत बनली 'NEET' टॉपर!

NEET UG Topper Ruby Prajapati: वडिलांच्या मित्राने कोचिंगसाठी केली आर्थिक मदत ; लहान भावाचा मृत्यूही बघितला मात्र हिंमत हारली नाही.
Ruby Prajapati
Ruby PrajapatiSarkarnama
Published on
Updated on

NEET UG Topper Ruby Prajapati Success Story : वडील रिक्षा चालक आणि आई पशूपालनाचे काम करते, घरची हालाखीची परिस्थिती त्यातही आजारपण व अन्य कौटुंबिक समस्या या सर्व अडथळ्यांवर मात करत गुजरातमधील रूबी प्रजापती या गुणी मुलीने देशातील कठीण परीक्षा म्हणून ओळखली जाणारी 'NEET' केवळ उत्तीर्णच केली नाही, तर या परीक्षेत ती टॉप रँकींगमध्येही आली आहे. doct

तिच्या या यशाबद्दल तिचे सध्या सर्वत्र कौतुक तर होत आहेच, शिवाय देशभऱातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आणि परीक्षार्थींसीठी रूबीचे हे यश एक आदर्श उदाहरण ठरले आहे. अनेक प्रसारमाध्यमं रूबीची ही यशोगाथा प्रसारित करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आपणही जाणून घेऊयात रूबीची गोष्ट.

दिल्लीतील सफदरजंग वर्धमान वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या रूबीला NEETमध्ये सुरुवातीस अपयश आलं होतं. मात्र तिने हार मानली नाही. तिचा अभ्यास तिने अधिक वाढवला, झालेल्या चुकांमधून शिकत नवीन गोष्टी शिकल्या. एकीकडे कुटुंबातील समस्यांनाही ती जवळून बघत होती. मात्र तिने तिच्या अभ्यासावर याचा परिणाम होवू दिला नाही. उलट ती अधिकच जिद्दीने अभ्यासाला लागली, कारण तिला तिच्या कुटुंबाची परिस्थिती बदलायची होती. तिला डॉक्टर व्हायचं होतं.

Ruby Prajapati
Uttar Pradesh Assembly By-Election: 'ती' एकमेव निवडणूक जेव्हा भाजपने 'सपा'च्या बालेकिल्ल्याला लावला होता सुरुंग!

रूबीचे वडील रिक्षा चालक असल्याने तिच्या घरची आर्थिक स्थिती तशी नाजूकच होती. त्यामुळे तिच्या शिक्षणासाठी तिला फारसा खर्च करणं अशक्य होतं. मात्र अशा कठीण प्रसंगी तिच्या वडिलांच्या एका मित्राने तिची ही जिद्द पाहून तिला शिक्षणासाठी मदत केली, ज्याबद्दल रूबी त्यांचे तोंडभरून आभार व्यक्त करते. त्यांनी रूबीचा शिक्षणाचा एक वर्षाचा संपूर्ण खर्च उचलला, ज्याचा रूबीला प्रचंड फायदा झाला आणि ती अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करू शकली.

खरंतर रूबी 2018 पर्यंत क्षयरोगाने ग्रासलेली होती. ९ वर्षांपूर्वीच तिच्या भावाचा आजारपणामुळेच मृत्यू झाला होता आणि तिच्या मोठ्या भावाला बोलण्यात अडचण येते. तिच्या कुटुंबीयांच्या मते आर्थिक परिस्थिती बिकट असल्या कारणाने तेव्हा तिच्या भावावर योग्य ते उपचार करता आले नाहीत. ही गोष्ट रूबीच्या मनावर खोलवर परिणाम करून गेली होती आणि त्यानंतर मग जेव्हा रूबी स्वत: आजारपणातून पूर्णपणे बरी झाली, तेव्हा ती झपाट्याने NEETच्या तयारीला लागली होती. अखेर रूबीने तिचे स्वप्न पूर्ण केले आणि आता तिचे ध्येय तिच्या गावात उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आहे.

Ruby Prajapati
US Presidential Elections : कोण जिंकणार, कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प? फेमस पाणघोड्याने दिले मोठे संकेत

एका मुलाखतीत रूबी सांगते, तिच्या कुटुंबाला कठीण काळातून बाहेर काढण्याचे तिने ठरवले होते. आपल्या कुटुंबाचे ती कणा म्हणून वर्णन करते. माझ्या आई-वडिलांचा माझ्यावरील विश्वास आणि काकांच्या(वडिलांचे मित्र) आर्थिक पाठबळामुळे मला सतत प्रेरणा मिळाली. तसेच NEET कोचिंगसाठी पैसे देण्याचा काकांचा निर्णय हा तिच्या या यशाच्या प्रवासातील महत्त्वाचा क्षण होता, असंही ती म्हणते. त्यांची मदत पैशांपेक्षाही जास्त होती, त्यामुळेच मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्यचं रूबीने सांगितले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com