Sakal Election 2024 Survey : हिंदुत्वाचाच मुद्दा नाही, तर विकासावरही मोदींना बोलावं लागणार!

Sakal Election Survey : 'अबकी बार 400 पार' असा नारा देत, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.
Sakal Lok Sabha Election 2024 Survey
Sakal Lok Sabha Election 2024 SurveySarkarnama
Published on
Updated on

Sakal Latest Election 2024 Survey News :  देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. तर, सर्वसामान्यांनाही या निवडणुकीची उत्सुकता आहे. 'अबकी बार 400 पार' असा नारा देत, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

यामध्ये प्रामुख्याने भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक भर देताना दिसत आहे. अयोध्येतील राम मंदिर सोहळा भव्यदिव्य करून देशभरातील हिंदूंची मनं जिंकण्याचा भाजपने मोठा आणि काही प्रमाणात यशस्वी प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यानंतर मोदी सरकारने CAAचाही निर्णय घेतला आहे.

याशिवाय, मोदी सरकार हिंदूंची ऐतिहासिक धार्मिक स्थळं जसं की वाराणसी, मथुरा आदी ठिकाणांकडेही जातीने लक्ष देताना दिसत आहे. यावरूनच आगामी निवडणुकीत भाजपकडून हिंदुत्वाचा प्रमुख मुद्दा असण्याची शक्यता आहे. परंतु भाजपला(BJP) केवळ हिंदुत्व नव्हे तर त्यापेक्षा जास्त विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य द्याव लागणार आहे. 'सकाळ माध्यम समूहा'कडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे समोर आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sakal Lok Sabha Election 2024 Survey
Sakal Election 2024 Survey : फोडाफोडीच्या राजकारणापासून दूर राहिलेल्या काँग्रेसला 'अच्छे दिन'!
Sarkarnama

महाराष्ट्र आणि देशाचे राजकीय मन जाणून त्यातून मत मांडण्याच्या उद्देशाने 'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने उमेदवार जाहीर होण्याआधी सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून पुणे, मुंबईसह राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांतील मतदारांची मते जाणून घेण्यात उमेदवार जाहीर होण्याआधी सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून पुणे, मुंबईसह राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांतील मतदारांची मते विविध प्रश्नांद्वारे जाणून घेण्यात आली.

यामध्ये भाजपकडून पुढे करण्यात येत असलेला हिंदुत्वाच्या मुद्द्याला यात मतदारांच्या दृष्टीने फारसं महत्त्वाचं नसल्याचे समोर आले आहे. या तुलनेत पंतप्रधान पदाचा चेहरा आणि पक्ष, विकास, धोरण, जाहीरनामा हे मुद्दे लक्षात घेऊन मतदारांकडून लोकसभा निवडणुकीत मतदान होणार असल्याचे दिसून आले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Sakal Lok Sabha Election 2024 Survey
Sakal Lok Sabha Election 2024 Survey : 'इंडिया'साठी 'हा' मुद्दा ठरणार धोक्याचा तर भाजपसाठी 'प्लसपाॅइंट'!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com