Sakal Election 2024 Survey : फोडाफोडीच्या राजकारणापासून दूर राहिलेल्या काँग्रेसला 'अच्छे दिन'!

Sakal Latest Election 2024 Survey News : राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांतील मतदारांची मतं जाणून घेतली गेली आहेत.
Sakal Election 2024 Survey
Sakal Election 2024 SurveySarkarnama
Published on
Updated on

Sakal Election 2024 Survey News : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षांसह सर्वसामान्यांच्याही नजरा निवडणुकीकडे आहेत. भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडी देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात पुन्हा सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. तर यंदा एनडीए आघाडीला सत्तेवर येऊ न देण्यासाठी विरोधकांनी I.N.D.I.A आघाडी स्थापन करून कंबर कसली आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातीलही राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीविरोधात महायुती असं चित्र निर्माण झालं आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये भाजपसह शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्ष आहेत.

तर महाविकास आघाडीत काँग्रेससह शरद पवारांची(Sharad Pawar) राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेसह मित्रपक्षांचा समावेश आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रंगतदार लढती पाहायला मिळणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sakal Election 2024 Survey
Sakal Election 2024 Survey : भाजपची जबरदस्त तयारी, लोकांच्या मनात महाविकास आघाडी; काय सांगतो 'सकाळ'चा महासर्व्हे?

शिवाय, महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणालाही पेव फुटले आहे. इच्छुक उमेदवारांसह दिग्गज नेते आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा महाराष्ट्रातील राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

याच पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांच्या अगोदर जनतेचं मत जाणून घेण्याचा 'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने प्रयत्न केला गेला. निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होण्याआधी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरांसह राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांतील मतदारांची मतं विविध प्रश्नांच्या आधारावर जाणून घेतली गेली.

सर्वेक्षणानुसार 2019च्या लोकसभा निवडणूक निकालाच्या तुलनेत काँग्रेस पक्षाला 2024च्या निवडणुकीत अच्छे दिन पाहायला मिळत आहेत. कारण जेव्हा आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करताना आपण कोणत्या पक्षाची निवड कराल? या प्रश्नावर जनतेचं मत जाणून घेण्यात आलं. यामध्ये भाजप 33.6 टक्क्यांसह अव्वल स्थानावर होता.

तर बाकी सर्व पक्षांना मागे टाकत काँग्रेसने दुसरा क्रमांक पटकावला आहे. मागील लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीच्या तुलनेत यंदा सर्वेक्षणातून काँग्रेसला मिळालेली पसंती निश्चिच काँग्रेससाठी अच्छे दिन असल्याचे दर्शवत आहे.

Sakal Election Survey
Sakal Election SurveySarakarnama
Sakal Election 2024 Survey
Sakal Election 2024 Survey : केंद्र-राज्य सरकारच्या कामावर लोक किती समाधानी? काय सांगतो 'सकाळ'चा ताजा सर्व्हे?

सर्वेक्षणानुसार समोर आलेली पक्षनिहाय टक्केवारी -

1) भाजप- 33.6 टक्के 2) काँग्रेस 18.5 टक्के 3) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- (शरदचंद्र पवार) -12.6 टक्के

4) शिवसेना (उबाठा) - 12.5 टक्के 5) शिवसेना (एकनाथ शिंदे) - 4.9 टक्के 6) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 3.9 टक्के

7) वंचित बहुजन आघाडी - 3.6 टक्के 8) महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 1.4 टक्के 9) अपक्ष - 1.1 टक्के

10) एमआयएम - 0.6 टक्के 11) आम आदमी पक्ष - 0.5 टक्के 12) स्वाभिमानी शेतकरी पक्ष - 0.4 टक्के

13) प्रहार - 0.3 टक्के 14) शेकाप 0.3 टक्के 15) भारत राष्ट्र समिती - 0.2 टक्के आणि 16) इतर - 5 टक्के

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com