शिंदेसाहेब, तुम्ही गुवाहाटीला गेला, त्यावेळी मी पहिले समर्थन केले; आता आमचा आवाज का दाबता?

मी शांत होत नाही, हे बघून दादा भुसे यांनी मला हाताला धरून ओढून घेतले आणि स्वतःच्या खुर्चीवर बसवले. पुन्हा मुख्यमंत्री बोलू लागले.
Maratha community meeting
Maratha community meetingSarkarnama

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर गुरुवारी (ता. २६ ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. मात्र, त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांचे माजी स्वीय सहायक योगेश केदार यांनी आम्हाला बोलू दिले नाही म्हणत बैठकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत केले आहे. तसेच, आरक्षणावर न बोलणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संभाजीराजे आणि इतर नेतेमंडळींचा समाचार घेतला आहे. (Sambhaji Raje's former PA attacked Chief Minister, Deputy Chief Minister & Sambhaji Raje)

केदारी यांनी एक फेसबुक पोस्ट लिहित कालच्या मराठा समाजाच्या बैठकीचा समाचार घेतला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कालची बैठक काही मराठा नेत्यांनी स्वतःचे कौतुक करून घेण्यासाठी बोलावली होती का? याचा दाट संशय येतोय. आरक्षण सोडून इतर चिल्लर गोष्टींवर चर्चा कोणत्या सरकारला आवडत नाही? अनेकांचा आवाज दाबला जात होता. अशी बैठक यापूर्वी कधीच बोलावली गेली नाही, त्यामुळे सरकारचे आभार माना हे संभाजीराजे वारंवार का बोलत होते? हेच कळले नाही. अरे सरकारचे परम कर्तव्य आहे की, मराठा समाजाला बोलावून त्यांची भूमिका ऐकण्याचे. सरकारने काल बैठक बोलावली म्हणजे काही उपकार केले नाहीत मराठा समाजावर. काही विकाऊ अभ्यासक आणि याचिकाकर्त्यांची नावं जाणीवपूर्वक पुढे करत होते. दुसरे अभ्यासक नाहीत का समाजात? या बाबी समाज म्हणून आम्हाला पटलेच नाही. महाराजांनी प्रामाणिक लोकांना महत्त्व द्यावे, चाटूगिरांना नाही. समाजात खूप दिग्गज लोक आहेत, पण ते समोर येऊ शकले नाहीत.

Maratha community meeting
नरेंद्र मोदींनी पत्र पाठवून केले पाचर्णे कुटुंबीयांचे सांत्वन; ‘जनतेसाठी उठणारा आवाज हरपला’

मराठ्यांना ५० टक्क्यांच्या आत ओबीसीमधूनच (इतर मागास प्रवर्ग) आरक्षण! ही घोषणा सुरुवातीलाच मी दिली. पण, मुख्यमंत्री शिंदे यांनी चिडून‘ हे बरोबर नाही’ असे बोलायला सुरुवात केली. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, साहेब तुम्ही जेव्हा गुवाहाटीला गेला होता ना? त्यावेळी तुमचे समर्थन करणारा पहिला मी असेन. भरपूर लेख लिहिले. मग आत्ता तुम्ही आमचा आवाज का दाबत आहात? त्यावर मुख्यमंत्री शिंदे हे लगेच नॉर्मल होऊन, हसून बोलायला लागले. मी पुन्हा म्हणालो की, गेली अडीच वर्ष आम्ही आमचे आयुष्य धोक्यात घालून आघाडी सरकारविरोधात आंदोलन करणारे लोक आहोत. शांत बसणार नाही. बोलणारच, असे मी ठणकावून सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मला काही काळ उचलून नेतो, बाहेर नेतो, अशा वल्गना करत घेरून ठेवले.

नेहमीप्रमाणे बैठक केवळ सारथी आणि इतर फुटकळ गोष्टींवर उरकून घेण्याचा नाद काही समन्वयक आणि नेत्यांनी ठेवला होता. सरकारलाही तेच पाहिजे असते. मी नंतर बराच वेळ वाट बघत होतो, की आत्ता आरक्षणवर येतील, मग येतील. पोलिसांचे दुर्लक्ष बघून मी मागून पुढे गेलो. तिथे उभारून २३ मार्च १९९४ च्या जीआरचा आधार घेत मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावे; म्हणून बोलायला सुरुवात केली. लगेच, शंभूराज देसाई आणि दादा भुसे नावाचे मंत्री आरक्षणाचा विषय आत्ता नको, आत्ता नको, नंतर बोलू म्हणून मला विरोध करू लागले. काही समन्वयकांनीही यात गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. मी जोरात बोलू लागलो. पुन्हा हे चतूर बोलू लागले की, मी उंच आवाजात बोलतोय. अरे असा आवाज दाबल्यावर माणूस जोरातच बोलणारच ना! एकदा सगळे पुन्हा शांत झाल्यावर पुन्हा बोललो की मराठ्यांनी सगळ्यात जास्त बलिदान कशासाठी दिले? तर आरक्षणासाठी असे सगळेच बोलले. मग त्यावर चर्चा करा ना. तरी पुन्हा गोंधळ झाला.

Maratha community meeting
भाजपने दिली प्रवीण दरेकरांवर मोठी जबाबदारी

गोंधळात प्रवीण दरेकर उठून बोलू लागले. मी समाजासाठी समाजाच्या समन्वयक कार्यकर्त्यांसाठी सढळ हाताने मदत केली. आजही करतोय. पण मी कधीही दाखवत नाही. आम्हीपण मराठा आहोत. असे बोलून मला थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. मी त्यांना म्हणालो, दरेकरसाहेब तुम्ही लय हुशार आहात आम्ही अडाणी आहोत. पण, आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या. त्यावर मलिद्याची अपेक्षा करणारे दरेकर काहीच बोलत नव्हते. का...? तर आता निष्ठा या नवीन सरकारवर दाखवायच्या होत्या. समाजाशी यांना काहीच घेणे देणे नाही.

Maratha community meeting
‘जयंतराव, असे ऑपरेशन करतात की दुखतही नाही अन्‌ कळतही नाही!’

मी शांत होत नाही, हे बघून दादा भुसे यांनी मला हाताला धरून ओढून घेतले आणि स्वतःच्या खुर्चीवर बसवले. पुन्हा मुख्यमंत्री बोलू लागले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना किती चांगल्या आहेत, हे बोलून दाखवले. त्यांचे भाषण झाल्यावर संभाजीराजेंनी आभार मानले. त्याही वेळी मी ५० टक्क्यांच्या आत ओबीसीमधूनच आरक्षण मराठ्यांना द्या, असे सरकारला निक्षून सांगितलं आणि बैठकीचा शेवट केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com