NCP News : ‘दशरथ माने चेअरमन होतील; म्हणूनच भरणेंनी ‘कर्मयोगी’ची निवडणूक सोडून दिली’ : राष्ट्रवादीच्या माजी नेत्याचा गौप्यस्फोट

‘कर्मयोगी’ची निवडणूक लढविण्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती.
Dattatray Bharane-Maharudra Patil-Dasaratha Mane
Dattatray Bharane-Maharudra Patil-Dasaratha ManeSarkarnama
Published on
Updated on

इंदापूर (जि. पुणे) : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची (Karmayogi Sugar Factory) निवडणूक झाली, तर सोनाई उद्योग समूहाचे दशरथ माने (Dasaratha Mane) चेअरमन होतील आणि आपल्याला आमदारकीसाठी (MLA) स्पर्धक तयार होईल, या भीतीपोटीच आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी कारखान्याची निवडणूक टाळली. ‘कर्मयोगी’ची निवडणूक लढविण्याची राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांची इच्छा होती, असा गौप्यस्फोट भरणे यांचे एकेकाळचे सहकारी आणि सध्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले महारूद्र पाटील यांनी केला. (Serious allegations against Maharudra Patil's former minister Dattatray Bharane)

इंदापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना महारुद्र पाटील यांनी माजी मंत्री भरणे यांच्यावर हल्लाबोल केला. इंदापूर तालुक्यात पवारांच्या निष्ठावंतांवर अन्याय केला जात आहे, असे सांगून पाटील यांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आमदार भरणे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत जोरदार समाचार घेतला.

Dattatray Bharane-Maharudra Patil-Dasaratha Mane
Indapur Politics : पवार निष्ठावंतांवर इंदापुरात अन्याय; भरणे गट म्हणजे कमिशन गोळा करणारी टोळी : महारुद्र पाटलांचा आरोप

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली असती तर सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने चेअरमन होतील आणि पुढे आमदारकीला स्पर्धक निर्माण होईल, या कारणाने आमदार भरणे यांनी कर्मयोगीची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आप्पासाहेब जगदाळे बिनविरोध निवडून जातात, यामागे काय गौडबंगाल असेल, असा प्रश्नही महारुद्र पाटील यांनी उपस्थित केला.

Dattatray Bharane-Maharudra Patil-Dasaratha Mane
Aurangabad Teachers Constituency : राणा पाटलांची यशस्वी शिष्टाई : क्षीरसागरांची ताकद भाजपच्या किरण पाटलांच्या पाठीशी

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकही दत्तात्रेय भरणे लढवणार नाहीत, असा दावा पाटील यांनी केला. जो निवडून येईल, तो आपला असले धंदे बंद करून कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम करावे, असा सल्लाही त्यांनी भरणे यांना दिला.

Dattatray Bharane-Maharudra Patil-Dasaratha Mane
Vidarbha News : विदर्भात बावनकुळेंचा काँग्रेसला दे धक्का : गडचिरोलीतील वरिष्ठ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

वेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, सुदर्शन साखरे, सीमा कल्याणकर, अशोक देवकर, वसंत आरडे, देविदास भोंग, माजी सभापती सुभाष जगताप, सूरज काळे, वैभव जामदार, बबन खराडे, विजय साखरे, अण्णा काळे, यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com