बांगर-सुर्वेंची दमबाजी आणि शिंदे-फडणवीस म्हणतात आमचीच मुस्कटदाबी...

Assembly Session 2022 : विधीमंडळाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांनी आमदारांच्या दमबाजीचा प्रश्न लावून धरला..
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly session 2022) रंग कसा असणार, याची झलक त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज दिसून आली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्तेची मस्ती आली आहे, असा घणाघाती आरोप आज केला. तसेच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) आणि प्रकाश सुर्वे (Prakash SUrve) यांची दमबाजीची वक्तव्ये म्हणजे सत्ता डोक्यात गेल्याचे लक्षण असल्याचा टोला लगावला.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Video : दोन आमदारांची मस्ती, पावसाळी अधिवेशन गाजणार

बांगर यांनी एका सरकारी अधिकाऱ्याच्या कानाखाली लावली आणि पुन्हा आपण असे कृत्य करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा दिला. सुर्वे यांनी शिवसेैनिकांचा हात सापडला नाही तर तंगडे तोडा, असे वादग्रस्त वक्तव्य केले. या दोन वक्तव्यांवर विरोधी पक्षाने आवाज उठवलाच. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणावरून पत्रकारांनी सायंकाळच्या पत्रकार परिषदेत धारेवर धरले. ठोस कारवाई सरकार का करत नाही, असा सवाल पत्रकारांनी केला. त्याला शिंदे यांनी थातुरमातुर उत्तर दिले. चौकशी सुरू आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. मी असो की कोणी आमदार असो कायदा सर्वांसाठी सारखा आहे, असे ते म्हणत होते. तसेच आधीच्या सरकारमध्ये शिवसैनिकांवर कसा अन्याय झाला, त्यांच्यावर पोलिसांचा दबाव आणून आपल्या पक्षात कसा राष्ट्रवादीने प्रवेश करून घेतला, हे सांगू लागले.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
फडणवीस आधीच म्हणाले होते; सुधीरजी मला अर्थ खात्याचा अनुभव घ्यायचा आहे...

त्यावर बांगर व सुर्वे या दोन आमदारांवर पत्रकार कारवाई करणार असा प्रश्न सतत विचारत होते. आम्ही या आमदारांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. पण चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ असे शिंदे म्हणाले. हा वादाचा वाटणारा मुद्दा मागे पडावा म्हणून फडणवीस यांनी चलाखीने मला एक महत्वाचे सांगायचे आहे असे म्हणून दुसरा मुद्दा मांडू लागले. त्यालाही पत्रकारांनी आक्षेप घेतला आणि बांगर व सुर्वे यांचे काय करणार, हे म्हणणे लावून धरले.

त्यानंतर फडणवीस यांनी येथे आमचीच मुस्कटदाबी सुरू असल्याचा टोला लगावला. तसेच या आधीच्या मुख्यमंत्र्यांना (म्हणजे ठाकरे यांना) प्रश्न विचारण्याची संधी पत्रकारांना मिळत नसल्याने ते आता संधी साधत आहेत, असाही टोमणा फडणविसांनी मारला. तरी या प्रश्नाचे ठोस उत्तर मिळण्यावर पत्रकार ठाम राहिले. मात्र चौकशी करून निर्णय घेऊ, हे पालुपद मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com