...अन्यथा शिवसेनेची अवस्था अकाली दलासारखी होईल : हर्षवर्धन पाटलांचे भाकित!

जुन्या मित्राची साथ सोडू नये, यातच शिवसेनेचे राजकीय हित असल्याचा सबुरीचा सल्ला ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
Harshvardhan Patil
Harshvardhan PatilSarkarnama

पंढरपूर : पाच राज्यातील निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजप (bjp) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी शिवसेनेला (shivsena) चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने भाजपसोबतच्या युतीचा फेरविचार करावा;अन्यथा शिवसेनेची पंजाबमधील अकाली दलासारखी विचित्र अवस्था होईल, असे राजकीय भाकित व्यक्त करत जुन्या मित्राची साथ सोडू नये, यातच शिवसेनेचे राजकीय हित असल्याचा सबुरीचा सल्ला ही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे. (Shiv Sena should reconsider its friendship with BJP : Harshvardhan Patil)

हर्षवर्धन पाटील हे भाजपचे नेते असले तरी त्यांचे ठाकरे कुटुंबीयांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या या सल्ल्ल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता, त्यांनी येथील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांतील निवडणूक निकालाचे राजकीय विश्लेषण करताना शिवसेनेच्या राजकीय भविष्याविषयी चिंताही व्यक्त केली.

Harshvardhan Patil
फंदफितुरी खपवून घेणार नाही; थेट हकालपट्टी करण्यात येईल : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा इशारा

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांत भाजपने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मुसंडी मारली आहे. मागील अनेक वर्षे पंजाबमध्ये अकाली दलाने भाजपसोबत निवडणुका लढवल्या. त्यामध्ये अकाली दलाला फायदा झाला. भाजपसोबतच्या युतीमुळे केंद्रातील सत्तेत वाटा मिळाला. भाजपची साथ सोडल्यानंतर पंजाबमध्ये अकाली दलाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तशीच अवस्था शिवसेनेचीदेखील होईल. त्यामुळे शिवसेनेने भाजपसोबतच्या मैत्रीचा फेरविचार करावा. त्यातच त्यांचे राजकीय हित आहे; अन्यथा शिवसेनेचीदेखील पंजाबमधील अकाली दलासारखी अवस्था होईल, असे भाकितही पाटील यांनी वर्तवले आहे.

Harshvardhan Patil
कात्रज डेअरी निवडणूक : शिरूरला या कारणामुळे तिसरी जागा बोनस मिळाली!

राज्यात सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या माध्यमातून महाष्ट्रात दररोज 7 हजार 500 मेगाॅवट वीजनिर्मिती होते. ती वीज ग्रीडला जोडली आहे. तरीही राज्यात वीजेचा तुटवडा असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. साखर कारखान्यांच्या माध्यमातून मुबलक वीजनिर्मिती होत असतानाही त्यात शेतकऱ्यांचीच वीज तोडली जात आहे, त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. सरकारच्या विरोधात शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेतेमध्ये मोठा असंतोष असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com