Solapur University : युवासेना, काँग्रेसची बाजी; पण क्रॉस वोटिंगमुळे संभाजी ब्रिगेडचा घात

या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचने सर्वाधिक पाच जागा जिंकत पदवीधर मतदारसंघ काबीज केला आहे.
Solapur University Senate Election
Solapur University Senate ElectionSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर (Solapur) विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत (Election) अन्य मतदारसंघ वगळता ‘पदवीधर’मध्ये क्रॉस वोटिंग व बाद झालेल्या मतांचा फटका ‘सुटा’सह अन्य पराभूत उमेदवारांना बसला. युवा सेनेकडून (yuvasena) ॲड. उषा पवार यांनी बाजी मारली, पण संभाजी ब्रिगेडचे उमेदवार सचिन खुळे यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचने सर्वाधिक पाच जागा जिंकत पदवीधर मतदारसंघ काबीज केला आहे. (Solapur University : Yuva Sena, Congress Win; Defeat of Sambhaji Brigade candidate due to cross voting)

सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघटनेने (सुटा) संभाजी ब्रिगेड व युवा सेनेला प्रत्येकी एक जागा पदवीधरसाठी दिली होती. काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनाही उमेदवारी दिली होती. लेबर फेडरेशनचे संचालक शंकर चौगुले यांनीही ‘सुटा’कडूनच उमेदवारी दाखल केली होती. सुरुवातीला काहींनी मिळून, पण निवडणूक जवळ आल्यावर प्रत्येकांनी आपापल्या पातळीवर प्रचार केला. प्रचारावर अधिक भर दिलेल्या उमेदवारांनी आपण विद्यार्थ्यांसाठी काय करणार आहोत, हे सांगितले. पण, मतदान कसे करायचे, हे सांगायला कमी पडले. त्यामुळे ३५० ते ९०१ मते बाद झाली आहेत.

Solapur University Senate Election
पालकमंत्री विखे-पाटील पहिल्याच दौऱ्यात देणार सोलापूरला ‘गुड न्यूज’!

सुमारे साडेआठ हजारांपैकी ४८ टक्केच मतदान झाले होते. त्यातही मतदान मोठ्या प्रमाणावर बाद झाले आणि क्रॉस वोटिंग झाल्याने अनेकांना अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागल्याचे पहायला मिळाले. सिनेटच्या पदवीधरमधून राजाभाऊ सरवदे, ॲड. निता मंकणी, उषा पवार, यतिराज होनमाने, वर्षाराणी कामुर्ती, चन्नबसप्पा बंकुर, अजिंक्य देशमुख, गणेश डोंगरे, सचिन गायकवाड, अजितकुमार संगवे यांनी विजय मिळवला.

Solapur University Senate Election
खेडमध्ये ठाकरेंना ‘अच्छे दिन’; आढळरावांच्या बंडानंतरही गोरे गटासह बहुतांश पदाधिकाऱ्यांची निष्ठा 'मातोश्री'वर

युवा सेनेचा जल्लोष

‘सुटा’कडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या युवासेनेच्या पदाधिकारी उषा पवार यांनी विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत विजय मिळविला. या पार्श्वभूमीवर युवा सेनेतर्फे पार्क चौकातील कार्यालयासमोर शनिवारी (ता. १ आक्टोबर) जल्लोष करण्यात आला. गुलालाची उधळण करून विजयी उमेदवार उषा पवार यांना पेढे भरविण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांचाही पवार यांच्या विजयात मोठा वाटा राहिला.

Solapur University Senate Election
मिलिंद नार्वेकरांच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

गणेश डोंगरेंनी पराभवाचे उट्टे काढले

विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत विजय संपादित केल्याबद्दल युवक काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांचा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. डोंगरे यांचा २०१७ मध्ये नऊ मतांनी पराभव झाला होता.

Solapur University Senate Election
खेड काँग्रेसचा शेवटचा बुरूजही ढासळला; आक्रमक अमोल पवारांचा शिवसेनेत प्रवेश

यतिराज होनमानेंची सिनेटमध्ये एन्ट्री

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत यतिराज होनमाने यांनी विद्यापीठ विकास मंचकडून विजय मिळविला. शुक्रवारी (ता. ३०) रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. टप्प्याटप्याने निकाल हाती येत होते. सर्वांचीच धाकधूक वाढली होती. अशा स्थितीत यतिराज होनमाने यांनी विरोधी उमेदवारांवर मात करीत सिनेटमध्ये एन्ट्री केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com