फडणवीसांनी भाजपच्या तीनही जागांच्या विजयाचं असं मांडलं गणित!

राज्यसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले.
BJP candidate for Rajya Sabha
BJP candidate for Rajya SabhaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) चौथा उमेदवार ठेवला, तरी आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही. आमचे तीनही उमेदवार भाजपचे (BJP) असून ते महाराष्ट्रातील आहेत. हे तिघेही सध्या राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. सद्‌सद्‌विवेक बुद्धीनेदेखील काही लोकं आम्हाला मतदान करणार आहेत, त्यामुळे आमचे तीनही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यसभेचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमाशी बोलताना व्यक्त केला. काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत, असा दावा फडणवीस यांनी केला असला तरी ते कुठल्या पक्षाचे लोक आहेत, हे त्यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे. (Some MLAs will vote for BJP : Devendra Fadnavis)

Piyush Goyal
Piyush GoyalSarkarnama

ते म्हणाले की, आम्हाला मतांचा घोडेबाजार करायचा नाही. आमचे तीन लोक निवडून येणार आहेत. महाविकास आघाडीने निर्णय घेतला पाहिजे. त्यांचे तीन, आमचे तीन. त्यांनी आपला एक उमेदवार मागे घेतला पाहिजे. त्यानंतर घोडेबाजाराचा प्रश्नच उरत नाही. पण, त्यांनी जरी चौथा उमेदवार ठेवला, तर आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही.

Anil Bonde
Anil BondeSarkarnama

राज्यसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले. तत्पूर्वी गोयल आणि महाडिक यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. फडणवीस म्हणाले की, केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर जात आहेत. राज्यसभेच्या नेतेपदाची त्यांच्यावर जबाबदारी आहे. ते निवडून जात आहेत, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. माजी कृषीमंत्री अनिल बोंडे हे डॉक्टर असले तरी कृषी क्षेत्राचा त्यांचा मोठा अभ्यास आहे. कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांचे सहकार क्षेत्रात मोठे काम आहे. त्यामुळे हे तिघेही निवडून येतील, असा माझा विश्वास आहे.

Dhananjay Mahadik
Dhananjay MahadikSarkarnama

तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज आम्ही विचारपूर्वकच भरलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे आम्ही तिसरा उमेदवार निवडून आणू, असा मला विश्वास आहे. आमचे पूर्वीही तीन होते, आताही तिघांचे अर्ज भरले आहेत. घोडेबाजार आम्ही करतच नाही. महाविकास आघाडीला पराभवाची भीती असेल तर त्यांनी आपला उमेदवार मागे घ्यावा. जी स्टॅटेजी केली जाते, ती माध्यमांमध्ये बोलून दाखवली जात नाही, असे सूचक वक्तव्यही फडणवीस यांनी या वेळी माध्यमांशी बोलताना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com