Sushilkumar Shinde News : ‘शंकरराव मोहिते पाटलांपासून मी अकलूजला जातोय; पण, काही लोकं भांडणं लावण्याचं काम करतात’ : सुशीलकुमार असं का म्हणाले

लीजवर ते बरचसं प्रकरण हताळतात. प्रत्येक ठिकाणी प्रभावीपणे काम ते करतात.
shankarrao mohite patil-vijaysinh mohite patil-sushilkumar shinde
shankarrao mohite patil-vijaysinh mohite patil-sushilkumar shindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur : मी शंकरराव मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून अकलजूला जातो आहे. पण, काही लोकं भांडणं लावण्याचं काम करत असतात. उगीचच कोणाच्या तरी मनात काहीतरी भरवत असतात, असे विधान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात केले. (Some people work to instigate quarrels : Sushilkumar Shinde)

सोलापुरातील (Solapur) एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar shinde) बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार, सुभाष देशमुख, यशवंत माने, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व इतर मान्यवर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, सुभाषरावांनी आज फार चांगलं भाषण केलं, मला जे बोलायचं होतं, तेच तुम्ही बोलून गेलात, त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सुभाषराव देशमुखांच्या भाषणात खूप प्रगती झालेली आहे. मी त्यांना फार पूर्वीपासून बघत आलो आहे. आज त्यांनी पुरस्कारार्थींचे फार छान कौतुक केले. तसेच, कोणी काय व्हावे याबाद्दल अपेक्षा व्यक्त केल्या.

माजी आमदार राजन पाटील यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण, त्यांनी आपल्या कन्येला पायलट होण्यासाठी विदेशात पाठवले. ही मोठी धाडसाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. राजन पाटील हे धाडस करतील, असे वाटलं नव्हतं. पण त्यांनी ते केलं. कॅनडात जाऊन त्यांच्या मुलीने प्रशिक्षण घेतले. ती गोष्ट करणे सोपे नाही. सुभाषबापू तुम्ही म्हणता ते खरं आहे. राजन पाटील हे विमान कंपनी स्थापन करतील. लीजवर मिळतं सगळं आजकाल. तुम्ही कसं त्या क्षेत्रात घुसले नाहीत. याचं मला नवल वाटतं. लीजवर ते बरचसं प्रकरण हताळतात. प्रत्येक ठिकाणी प्रभावीपणे काम ते करतात. सोलापुरातून आजपर्यंत कोणीही पायलट म्हणून गेलेले नव्हतं. पण, राजन पाटील यांची कन्या गेली. त्यामुळे सोलापुरातील मुलांसमोर आज मोठं आव्हान आहे, असेही माजी केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

लक्ष्मण ढोबळेंचं नाव हल्ली माझ्याकडून विसरत आहे

आमचे सहकारी लक्ष्मण ढोबळे यांचं नाव हल्ली माझ्याकडून विसरत आहे. पूर्वी ते माझे चांगले सहकारी होते, पण राजकारणात आम्ही दोघे वेगवेगळो आहेात. मोहिते पाटील (Mohite patil) घराण्यातही आता इंटरनॅशनल भूमिका मांडण्याचा विचार होतो आहे, यांचं मनापासून कौतुक करतो.

'प्रणिती शिंदे माझीच मुलगी, ती पुढे पुढे जात राहील'

प्रणिती शिंदे ही माझी मुलगीच आहे, त्यामुळे ती पुढे पुढे जात राहील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आता आम्ही लोकांनी काढता पाय घेतला पाहिजे, तरुणांचा मार्ग मोकळा केला पाहिजे, हे सर्व तुमच्या समक्षच सांगून टाकतो. नव्या पिढीच्या हातात सर्वकाही आलं पाहिजे. वयाच्या ८२-८३ सालापर्यंत काय रखडत बसलाय तुम्ही. नव्या पिढीकडे तुम्ही काही तरी ठरवून दिलं पाहिजं. नव्या पिढीच्या हाती खूप काही देण्यासाखं आहे. आम्ही देत राहू, तुम्ही त्याचा स्वीकार करावा, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा राजकीय निवृत्तीचे संकेत दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com