Parliament Special Session 2023 : स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सात वेळा बोलावले संसदेचे विशेष अधिवेशन, 'काय' होती कारणे?

Sansad Vishesh Adhiveshan : संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून, हे विशेष अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
Parliament Special Session
Parliament Special Session Sarkarnama

New Delhi : संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून, हे विशेष अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. दोन आठवड्यांपूर्वीच केंद्र सरकारने या विशेष अधिवेशनाची घोषणा केली होती. तेव्हापासून या अधिवेशनाबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात होते. राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन बोलावतात. पण राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असले तरी ते संसदेच्या चर्चेत भाग घेत नाहीत; पण तुम्हाला माहिती आहे का, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत सात वेळा संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

वाचा, आतापर्यंत कधी कधी संसदेची विशेष अधिवेशने झाली?

पहिले विशेष सत्र : 14-15 ऑगस्ट 1947

भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेज 14-15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय संसदेचे पहिले विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून भारतीय लोकांच्या हाती सोपवण्यात आले होते. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताचा स्वतंत्र, सार्वभौम प्रवास सुरू झाला. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही त्यांच्या 'Tryst With Destiny' या भाषणात याचा उल्लेख केला होता.

Parliament Special Session
Special Parliament Session : विशेष अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी काँग्रेसचा काय आहे 'सुपर प्लॅन'?

दुसरे विशेष सत्र : 8 आणि 9 नोव्हेंबर 1962

तत्कालीन जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या विनंतीवरून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने नोव्हेंबर 1962 विशेष अधिवेशन बोलावले. या अधिवेशनात भारत-चीन युद्ध परिस्थितीवर चर्चा करण्याचा अजेंडा होता. 8 आणि 9 नोव्हेंबरला वादविवाद, नेहरूंच्या टिप्पणी आणि वाजपेयींच्या धारदार शाब्दिक बाणांनी हे विशेष अधिवेशन भारत-चीन युद्धादरम्यानच पार पडले.

तिसरे विशेष सत्र : 14-15 ऑगस्ट 1972

14-15 ऑगस्ट 1972 हे दोन खास होते. याच कारण म्हणजे, तत्कालीन केंद्र सरकारने भारताच्या स्वातंत्र्याची २५ वर्षे साजरी करण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित केले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे विशेष अधिवेशन बोलावले होते.

चौथे विशेष सत्र : 9 ऑगस्ट 1992

9 ऑगस्ट 1992 हे संसदेचे मिडनाईट विशेष अधिवेशन होते. महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी त्यांच्या 'करो या मरो' या भाषणाने भारत छोडो चळवळ सुरू केली होती. या भारत छोडो आंदोलनाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त हे अधिवेशन बोलावण्यात आले होते. महात्मा गांधींचे हे आंदोलन म्हणजे ब्रिटिश वसाहतवादावर मोठा वार होता.

पाचवे विशेष सत्र : 14-15 ऑगस्ट 1997

स्वातंत्र्याच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त 14-15 ऑगस्ट 1997 रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते.

Parliament Special Session
Parliament Special Session : संसदेच्या विशेष अधिवेशनाकडे देशाचे लक्ष; 'या' चार विधेयकांवर होणार निर्णय

सहावे विशेष सत्र : 26-27 नोव्हेंबर 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहत भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील दोनदिवसीय विशेष सत्र वर्षभर चाललेल्या उत्सवाचा भाग होता.आपल्या राजकारणाची संविधानाप्रती असलेली बांधिलकी हा या विशेष अधिवेशनाचा विषय होता.

सातवे विशेष सत्र : 30 जून 2017

केंद्र सरकारने 30 जून 2017 'जीएसटी'मध्ये सुधारणा करण्यासाठी मध्यरात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलवाले होते. देशात जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक आर्थिक सुधारणा दिसून आल्या आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Parliament Special Session
Parliament Special Session : संसदेच्या विशेष अधिवेशनाकडे देशाचे लक्ष; 'या' चार विधेयकांवर होणार निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com