Kasba by-election : कसब्यात पुन्हा नाराजीचे बॅनर; भाजपला फटका बसणार? असे आहे मतांचे गणित

Bjp News : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे.
Hemant Rasane, Ravindra Dhangekar News
Hemant Rasane, Ravindra Dhangekar NewsSarkarnama

Kasba by-election News : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने (BJP) हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कसबा मतदार संघातील ब्राह्मण मतदार नाराज झाल्याची चर्चा आहे. यातच भाजपच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे नाराज झालेल्या ब्राह्मण मतदारांचा भाजपला फटका बसणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

कसबा मतदार संघात आजही काही बॅनर लागलेले दिसते, त्यावर ''आमचे ही ठरले, धडा कसा शिकवायचा...कसबा हा गाडगीळांचा...कसबा हा बापटांचा...कसबा हा टिळकांचा...का काढला आमच्याकडून कसबा...आम्ही दाबणार नोटा...असे म्हटले आहे. त्यामुळे भाजपला नुकसान होईल का अशी चर्चा सुरु आहे.

Hemant Rasane, Ravindra Dhangekar News
Mla Shrikant Bhartiya : फडणवीसांच्या खास आमदारावर भाजपची 2024 ची जबाबदारी; नाशिकच्या कार्यकारिणीत निर्णय

कसबा मतदार संघाचे नेतृत्व सध्या पुण्याचे खासदार असलेल्या गिरीष बापट यांनी पाच वेळा केले आहे. त्याच्यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना संधी मिळाली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक लागली आहे. भाजपकडून शैलेश टिळक किंवा कुणाल टिळक यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. परंतु हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाली. तर काँग्रेसने (Congress) रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पहिल्यादांच ब्राह्मण-ब्राह्मणेतर उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे.

या मतदार संघात एकूण मतदारसंख्या २ लाख ७५ हजार ४२८ आहे. तर १३ टक्के ब्राह्मण मतदार आहेत. त्यामुळे हा पारंपारीक मतदार भाजपासून दूर गेला तर त्यांचा उमेदवार अडचणीत येवू शकतो. परंतु इतर मतदार संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. कसब्यात सर्वाधिक मतदार हे इतर मागासवर्गीय असून, त्या खालोखाल मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या आहे. ही कसब्यात ही मत मोठ्या प्रमाणात भाजपाला मिळत आली आहेत. या निवडणुकीत या मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

कसबा मतदारसंघात ब्राह्मण समाजाचे मतदार ३६ हजार ४९४ असून हे मतदार निर्णायक नसल्याचे म्हटले जात आहे. मतदारसंघात सर्वाधिक मते ही इतर मागासवर्गाची ३१. ४५ टक्के म्हणजे ८६ हजार ६२२, तर मराठा आणि कुणबी २३. ८५ टक्के म्हणजे ६५ हजार ६९० आहे. इतर मागासवर्ग, मराठा व कुणबी मते भाजपची पारंपारिक मते असल्याचे जाणकार सांगतात. भाजपने कोणताही उमेदवार दिला, तरी त्यांच्या पाठीशी हा मतदार असतो. भाजपच्या उमेदवारांना या मतदारांबरोबरच ब्राह्मण समाजाची साथ मिळाल्याने त्यांना फायदा मिळाला आहे.

Hemant Rasane, Ravindra Dhangekar News
Pankaja Munday News : पंकजांची नाराजी दूर? फडणवीस-मुंडेंचा एकाच गाडीतून प्रवास...

मतदारसंघात मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहे. मुस्लिम मतदार हे २८ हजार ९२०, तर जैन, ख्रिश्चन आदी समाजाची सुमारे १९ हजार मते आहेत. या मतदारांची कायम विभागणी होत आली आहे. मतदार संघात काँग्रेसबरोबर भाजपलाही मुस्लिम मतदार साथ देत आला असल्याचे बोलेल जाते. जैन, ख्रिश्चन ही मते भाजप व काँग्रेसला मिळत असल्याचे सांगितले जाते. मात्र, आता हा मतदार रासने कि धंगेकर यांच्यापैकी कोणाच्या पाठिशी उभा राहणार यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com