Rajasthan Politics : कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार गेहलोतांच्या मदतीला; अशी असणार खास रणनीती...

Ashok Gehlot News : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कर्नाटकातील काँग्रेसचा निवडणूक प्रचार सांभाळणाऱ्या टीमवर प्रचार आणि रणनीतीची जबाबदारी दिली आहे.
Ashok Gehlot News
Ashok Gehlot NewsSarkarnama

Congress News : कर्नाटकमध्ये काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यानंतर आता काँग्रेस इतर राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. काँग्रेसने राजस्थानवर विषेश लक्ष केंद्रीत केले आहे. येथे पुन्हा सत्तेवर येण्यासाठी पक्षाने खास रणनीती तयार केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कर्नाटकातील काँग्रेसचा निवडणूक प्रचार सांभाळणाऱ्या टीमवर प्रचार आणि रणनीतीची जबाबदारी दिली आहे.

महागाई निवारण शिबीर अशा विविध प्रयोगांमध्ये ही टीम गुंतलेली आहे. कर्नाटकची ही टीम मध्य प्रदेश मध्येही काँग्रेसचे काम सांबाळणार असल्याची चर्चा आहे. मात्र, राजस्थामध्ये (Rajasthan) रणनीतीकारांचे काम सुरु झाले आहे, असे सांगितले जात आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे सर्वेक्षण, प्रचार आणि रणनीतीवर काम सुरु आहे.

Ashok Gehlot News
Solapur Congress News : तुम्ही जबाबदारी घ्या; सुशीलकुमार शिंदे लोकसभेला उभे राहतील : पटोलेंचा काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश

काँग्रेसने (Congress) गेल्या दशकभरात राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये विजय मिळवला होता. यातील सर्वात मोठा विजय नुकताच कर्नाटकात झाला आहे. कर्नाटक हे देशातील पाच सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे. या विजयामागे काँग्रेसची स्वत:ची मेहनत आणि भाजपविरोधातील सत्ताविरोधी भूमिका, तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासोबत असलेले सुनील कानुगोलू आणि नरेश अरोरा यांची भूमिकाही महत्त्वाची मानली जात आहे.

अरोरा यांनीच राजस्थानमध्ये बजेट थीम आणि महागाई निवारण शिबिराची योजना आखली होती. राजस्थान विधानसभा निवडणुकीत अरोरा यांची टीम काँग्रेससाठी रणनीती तयार करणार असल्याचे निश्चित झाले आहे. जेव्हा गेहलोत यांनी अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा अर्थसंकल्पाचे ब्रॅंडिंग करण्यात आले होते. त्यानुसार एक थिम तयार करण्यात आली होती. त्यामध्ये (बचत, राहत और बढ़त) अशा पद्धतीने प्रचार करण्यात आला. त्यानंतर आता महागाई निवारण शिबिराचे आयोजन केले जात आहे.

Ashok Gehlot News
Karnataka News : काँग्रेसने शब्द पाळला; पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 'पाच गॅरंटी' बाबत आदेश; मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले…

नरेश अरोरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''कर्नाटकच्या नुकत्याच झालेल्या विजयामुळे आम्ही सर्वजण उत्साहित आहोत. सध्या दिल्लीत पक्षाशी विविध पातळ्यांवर आमची बोलणी सुरू आहे. आम्ही राजस्थानमध्येही सरकारसोबत काम करत आहोत. कर्नाटकात काँग्रेसला जे यश मिळाले, त्याचीच पुनरावृत्ती राजस्थानमध्ये करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

1) 'राहत, योद्धा और नए वादे' मुख्यमंत्री गेहलोत यांची प्रतिमा तीन प्रकारे तयार करण्यात येणार आहे. जनतेला महागाईपासून दिलासा देणारे मुख्यमंत्री अशा पद्धतीने प्रचार केला जाणार आहे. 2) 'ताकतवर राजनीतिक योद्धा का रूप' केंद्रातील बलाढ्य भाजप (BJP) सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी लढणारे नेते. कारण, राजस्थानमधली सरकार पाच वर्ष पूर्ण करणार आहे. राजस्थानमध्ये 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झाले नाही, असे काँग्रेस म्हणत आहे.

Ashok Gehlot News
Solapur Politic's : सोलापूर भाजपच्या माजी शहराध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

3) कर्नाटक प्रमाणेच नवीन आश्वासनांसह काँग्रेस प्रचाराचत उतरणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यासोबत नव्या आश्वासनांची हमीही दिली जाणार आहे. राजस्थान सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांमध्ये घेऊन जाण्यासाठीही विशेष रणनीती तयार करण्यात आली आहे. तसेच कर्नाटकप्रमाणेच राजस्थामध्येही आश्वासने दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com