Ajit Pawar News : ‘त्या’ गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे काहीएक कारण नाही : अजितदादा अखेर त्या बातमीवर बोलले

अजित पवार भाजपसोबत जाऊन सरकार बनविणार, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यावर राज्यात मोठा गदारोळ उठला हेाता.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अलीकडच्या काळात न विचारताच बातम्या दिल्या जातात, त्यामुळे कारण नसताना आपल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. मात्र, त्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे काहीएक कारण नाही, अशी ग्वाही या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या निमित्ताने मी माझ्या सहकारी मित्रांना देतो, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. (There is no reason to believe in 'those' things : Ajit Pawar)

महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज एक मे दिनी मुंबईत झाली. त्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. अजित पवार भाजपसोबत जाऊन सरकार बनविणार, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यावर राज्यात मोठा गदारोळ उठला हेाता. त्यावर आज पवार यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मुंबईचं मराठीपण टिकविण्याचे आणि मुंबईची मान वाढविण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. मुंबईत शिवसेनेमुळे मराठी माणसांची मान राखला गेला आहे. हेच शिवसेनेचे काम काही लोकांच्या डोळ्यावर यायला लागलं. त्यातून शिवसेना फोडण्याचं काम झालं.

Ajit Pawar
Mahavikas Aghadi Sabha : पंचवीस वर्षे सोयरीक असलेल्या भाजपनेच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला : भाई जगतापांचा हल्लाबोल

हे सरकार आल्यापासून झालेल्या सर्व निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळविले आहे. सर्वांनी एकत्र येऊन भाजपशी टक्कर देण्याची गरज आहे. अडचणी असूनही महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले आहे. मात्र, सध्याची राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. अनेकांची देणी थकली आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका राज्यकर्त्यांची नाही. शिंदे-फडणवीस काय करतात. त्यांच्या याकडे लक्ष नाही का, असा सवालही पवार यांनी केला.

Ajit Pawar
Sangli Bazar samiti Election : दिप्या कुठे आहे?; त्याला मस्ती आली आहे : विजयी उमेदवाराच्या समर्थकाकडून पराभूताच्या कुटुंबीयास धमकी

महाराष्ट्रातील बिघाडलेल्या कायदा-सुव्यवस्थेला सरकार जबाबदार नाही का. राज्यात पाच मे पर्यंत पाऊसचा अंदाज आहे. आपल्याला बळीराजला आधार देण्याचे काम करावे लाणार आहे. सरकार निवडणुका का घेत नाही. या सरकारला भीती कशाची वाटते आहे. त्यांच्या मनात भीती आहे. जनता काय करेल, याचा विश्वास शिंदे फडणवीसांच्या मनात नाही. मुंबईत प्रशासक आहे. मुंबई महापालिका निवडणुका टाळण्याचे काम सरकारकडून केले जात आहे, असे माजी उमुख्यमंत्री पवार यांनी सूचित केले.

Ajit Pawar
Konkan News : शिवसेनेचा राष्ट्रवादीला धक्का : तालुकाध्यक्षांनी घेतले शिवधनुष्य हाती

पवार म्हणाले की, महागाई प्रचंड वाढलेली आहे. जाहिरातीवर खर्च केला जात आहे. हे जनतेच्या मनातील सरकार नाही. हे गद्दारी करून आलेले सरकार आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्यापुढे आहे. मात्र, शिवाजी महाराजांच्या राज्यात चुकीचं पद्धतीने राज्य कारभार चालला आहे. सरकार नोकर भरती का केली जात नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com