Cabinet expansion News : फडणवीसांच्या वक्तव्यानंतर शिरसाट, कडू अ्न गोगावलेंच्या आशा पल्लवित

Cabinet expansion News : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार...
Bacchu Kadu, Sanjay Shirsat, Bharat Gogawle
Bacchu Kadu, Sanjay Shirsat, Bharat Gogawle Sarkarnama

Cabinet expansion News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबात महत्त्वाचे विधान केले आहे. त्यामुळे आता मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्यांच्या आशा पल्ल्वीत झाल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आणि भाजमधील नेत्याचे डोळे सध्या दिल्लीकडे लागले आहेत.

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या वतीने दिल्लीत सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना विशेषतः मंत्रिमंडळ विस्ताराच्या अंगाने चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर तो होईल, असे सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपकडून (BJP) सांगितले जात होते. मात्र, अद्यापपर्यंत तरी त्याला मुहूर्त मिळू शकलेला नाही.

Bacchu Kadu, Sanjay Shirsat, Bharat Gogawle
Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात सतीश उकेंचा चक्क ईडी कोठडीतून युक्तिवाद

मंत्रिपदासाठी राज्यातील अनेक इच्छूक सध्या गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. विशेषतः शिंदे गटातील आमदारांनी उघडपणे ते बोलून दाखवले आहे. आता तर अनेकांचा संयम संपत चालेला आहे. त्यातूनच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट, अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखवली आहे.

तसचे याशिवाय न बोलताही अनेक आमदार मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने नाराज आहेत. या नाराजीचा भडका उडण्याआधीच मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्या संदर्भात फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, हे स्पष्टपणे सांगितले आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, कायदेशीर आणि घटनात्मक दृष्टीनेच हे सरकार स्थापन झालेले आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, असे मलाही वाटते. कारण, अनेक मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खाती आहेत. जेव्हा विधानसभा आणि विधान परिषदेत एकाच विषयावर चर्चा सुरू असते, तेव्हा आमची ओढाताण होते. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आम्हाला करायचा आहे, तो आम्ही करू. पण, मंत्रिमंडळ विस्तारासाठी कोणतीही कायदेशीर अथवा संविधानिक अडचण नाही.

Bacchu Kadu, Sanjay Shirsat, Bharat Gogawle
Satyajit Tambe News : सत्यजीत तांबे थोरातांचे टेन्शन आणखी वाढवणार...लवकरच भाजप प्रवेश?

योग्य वेळी आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. शक्य तो अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच आम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे, असेही फडणवीस यांनी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे विशेष करुन संजय शिरसाट, बच्चू कडू, आणि भरत गोगावले यांच्या आशा पल्ल्वीत झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com