पोलिस दलात मोठी खांदेपालट : नम्रता पाटील, मिलिंद मोहितेंसह ७८ अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या

आयपीएसनंतर आता एसपीएस तथा मपोसे अधिकाऱ्यांत मोठा फेरबदल लवकरच होणार आहे
Maharashtra Police
Maharashtra PoliceSarkarnama

पिंपरी : राज्यातील डीसीपी तथा एसपी, डीआयजी (अॅडिशनल सीपी), आयजी आणि अॅडिशनल डीजी या हुद्यांवरील आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नुकताच मोठा खांदेपालट करण्यात आला. त्यानंतर आता ७८ डीसीपी तथा एसपी, अॅडिशनल एसपी या राज्य पोलिस (Police) सेवेतील (एसपीएस-मपोसे) अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. कोरोनाने रखडलेल्या या बदल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य सरकार (State government) करणार आहे. (Transfers of 78 police officers including Pournima Gaikwad, Namrata Patil, Milind Mohite)

या बदल्या याच महिन्यात होणार आहेत, त्यात पिंपरी-चिंचवडमधील डीसीपी (परिमंडल तथा झोन दोन) आनंद भोईटे, पुण्यातील पौर्णिमा गायकवाड (झोन तीन), नम्रता पाटील-चव्हाण, राहुल श्रीरामे (डीसीपी ट्रॅफिक), सागर पाटील (झोन दोन) आणि पुणे ग्रामीणमधील मिलिंद मोहिते (अॅडिशनल एसपी, बारामती) यांचा नंबर लागणार आहे.

Maharashtra Police
सोलापूरकरांनो, गैरसमज करून घेऊ नका; ‘ती’ योजना जुनीच : भरणे

दोन वर्षांची टर्म पूर्ण केल्याने या बदल्या केल्या जाणार आहेत. अधिकाऱ्यांच्या पसंतीनुसार त्या होणार आहेत, त्यासाठी त्यांना बदलीच्या तीन ठिकाणांचा पसंतीक्रम विचारण्यात आला आहे. येत्या १८ मे पर्यंत त्यांना तो मेलव्दारे डीजीपी ऑफिसला कळविण्यास राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीवकुमार सिंघल यांनी सांगितले आहे.

Maharashtra Police
काय थट्टा चालवली काय? : राज ठाकरेंची वाढीव सुरक्षा पाहून मनसे नेते संतापले

बदल्या होणारे इतर काही अधिकारी ः

पोर्णिमा चौगुले आणि विजय खरात ः डीसीपी नाशिक

दीपाली घाटे, वैशाली कडूकर आणि बापू बांगर ः डीसीपी, सोलापूर

गजानन राजमाने ः डीसीपी, नागपूर

दीपक गिर्हे ः डीसीपी झोन एक, औरंगाबाद

विक्रम साळी ः डीसीपी,अमरावती

तिरुपती काकडे ः अॅडिशनल एसपी, कोल्हापूर

खंडेराव धर्मे ः अॅडिशनल एसपी, यवतमाळ

जयश्री जाधव ःअॅडिशनल एसपी,गडहिंग्लज, कोल्हापूर

सुनील लांजेवार ः अॅडिशनल एसपी, बीड

विक्रांत देशमुख ः अॅडिशनल एसपी, जालना

बजरंग बनसोडे ः अॅडिशनल एसपी, बुलडाणा

अनिकेत भारती ः अॅडिशनल एसपी,भंडारा

चंद्रकांत खांडवी ः अॅडिशनल एसपी, मालेगाव,नाशिक

जयश्री देसाई ः अॅडिशनल एसपी, रत्नागिरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com