माझ्याविरोधात कुठूनही उभे राहा अन्‌ निवडून येऊन दाखवा : राजन पाटलांना उमेश पाटलांचे चॅलेंज

ज्या पवार कुटुंबीयांच्या जीवावर तुम्ही मोठे झालात, त्यांचे फोटो फलकावरून गायब करता. मग माझ्या विरोधात बारामती जाऊन तक्रारी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला.
Rajan Patil-Umesh Patil
Rajan Patil-Umesh PatilSarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : तुमच्या मागे खरोखरच जनता असेल तर कुठूनही माझ्या विरोधात अपक्ष अथवा कुठल्याही पक्षाकडून उभे राहून निवडून येऊन दाखवा. स्वतःला तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून घेता निदान गावातील लोकांचे तरी भाग्य पाहा. ज्या पवार (Pawar) कुटुंबीयांच्या जीवावर तुम्ही मोठे झालात, त्यांचे फोटो फलकावरून गायब करता. मग माझ्या विरोधात बारामतीत (Baramati) जाऊन तक्रारी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा खडा सवाल करत ‘मला आता कोणीही थांब म्हणून सांगितलं, तरीही मी आता थांबणार नाही, लोकशाही आहे, बोलत राहणारच, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांना नाव न घेता दिले. (Umesh Patil of NCP criticizes former MLA Rajan Patil)

मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी स्वखर्चातून बांधलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणा व पेव्हिंग ब्लॉकचे उद्‌घाटना वेळी उमेश पाटील यांनी पुन्हा राजन पाटील यांना लक्ष्य केले. गेल्या वर्षभरापासून उमेश पाटील हे राजन पाटील यांच्यावर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेल्या जनता दरबाराच्या माध्यमातून उमेश पाटील हे पाटील यांच्या कार्याचे वाभाडे काढत आहेत.

Rajan Patil-Umesh Patil
सोलापुरातून आणखी एक महिला सरपंच गायब; पण पोलिसांच्या सतर्कतेने ४८ तासांत सापडल्या

गेल्या ३० वर्षांपासून सत्ता तुमच्याकडे होती. मोहोळमध्ये साधे इंजिनिअरिंग कॉलेज, कृषी महाविद्यालय, एवढेच नव्हे तर सुसज्ज असे रुग्णालयही नाही. मग तीस वर्षे काय केलं? मोहोळ नगर परिषदेला कोट्यवधींचा निधी येऊ लागला, याची सल सुरू झाल्याने अनगर नगर परिषद करून घेतली. मोहोळ शहरात ग्रामीण रुग्णालय आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून याची दुरवस्था आहे, ते सुधारण्यासाठी प्रयत्न राहिले बाजूला. पण, स्वतःच्या गावात मात्र ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतले ही कुठली नीती. बारामतीकरांचे नेतृत्व स्वीकारता. मग त्या ठिकाणच्या सोयी सुविधा पाहून त्या आपल्याकडे होण्यासाठी कधी प्रयत्न केला का, केवळ पदे घेण्यासाठी व माझ्या विरोधात सांगण्यासाठी बारामतीला जाता काय, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.

Rajan Patil-Umesh Patil
आधी पवारांसोबत एकत्र प्रवास; आता अभिजित पाटलांची रोहित पवारांसोबत डिनर डिप्लोमसी!

शेतकऱ्याचे मंदिर असलेला सहकारी साखर कारखाना एका रात्रीत खासगी कसा केला. तालुक्यातील शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची वर्षानुवर्ष रखडलेली कामे एक जिल्हा परिषद सदस्य चुटकीसरसी करतो, मग तुम्हाला काय अडचण आहे, असा सवाल करून राजन पाटील यांच्या भाजपच्या प्रवेशाचे वाभाडे करताना उमेश पाटील म्हणाले, भाजपात जायचे म्हणून यांनी राष्ट्रवादीचे चिन्ह घड्याळ हे फलकावरून काढून टाकले. तसेच, ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार व घड्याळाचा ही त्याग केला हे अधोरेखित झाले आहे. भाजपनेही यांना प्रवेश देणे टाळले आहे. कारण, भाकड गाय सांभाळणार कोण, अशी यांची अवस्था झाली असल्याची टीका उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com