Pawar Vs Fadnavis : सत्तेशिवाय जगू शकत नाही, ही फडणवीसांची अस्वस्थता महाराष्ट्रासमोर आणायची होती; शरद पवारांचे सूचक विधान

ती शपथ घ्यायची होती, तर ती अशी चोरून का घेतली पहाटे. आमचा त्यांना पाठिंबा होता, तर दोन दिवसांनंतर ते सरकार राहिलं का. दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली.
Devendra Fadnavis-Sharad Pawar
Devendra Fadnavis-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politic's : त्या शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीस आम्हाला भेटले, ही गोष्ट खरी आहे. त्यांच्याशी अनेक गोष्टींवर चर्चा झाली होती. मी धोरण बदललं असं त्यांचं म्हणणं असेल तर दोन दिवसांनी शपथ घ्यायचं कारण काय होतं. सत्तेसाठी आम्ही कुठंही जाऊ शकतो. ही जी त्यांची पावलं होती, ते समाजासमोर यावीत, यादृष्टीने काही गोष्टी केलेल्या होत्या. तसेच, आम्ही सत्तेसाठी किती अस्वस्थ आहोत, त्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. जगू शकत नाही, ही त्यांच्या अस्वस्थता एकदा महाराष्ट्राच्या समोर आणण्याची आवश्यकता होती, अशी गुगली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा टाकली. (We had a meeting with Devendra Fadnavis before that swearing-in : Sharad Pawar)

पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीत पवारांनी आमच्यासोबत डबलगेम केला, असे विधान केले होते. त्याला शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुन्हा एकदा आपल्या पद्धतीने उत्तर दिले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच सांगितलं की पाठिंब्यासंबंधीचं धोरण दोन दिवसांनी मी बदललं. मी धोरण बदललं तर त्याच्या दोन दिवसांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं. ती शपथ घ्यायची होती, तर ती अशी चोरून का घेतली पहाटे. आमचा त्यांना पाठिंबा होता, तर दोन दिवसांनंतर ते सरकार राहिलं का. दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली, त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

Devendra Fadnavis-Sharad Pawar
Leaders of Opposition Meeting : विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीसंदर्भात शरद पवारांची महत्वपूर्ण माहिती; ही बैठक शिमल्याऐवजी 'या' शहरात होणार

देवेंद्र फडणवीसांच्या फसविले गेल्याच्या आरोपावर पवार म्हणाल की, ते फसले का. उद्या मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला गर्व्हनर करतो. तुम्ही शपथ घ्यायला याल का. नरेंद्र मोदी यांचा त्याच्याशी संबंधच नव्हता. सत्तेशिवाय करमत नव्हतं, ते मोदी नव्हते. ते राज्यातील होते. माझ्याशी त्यांची भेट झाली होती. मी यापूर्वीही सांगितलं की, आम्ही अनेकदा भेटतो. आजही भेटतो. याचा अर्थ या गोष्टी नसतात. पण, आम्ही सत्तेसाठी किती अस्वस्थ आहोत, त्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. जगू शकत नाही, ही त्यांच्या अस्वस्थता एकदा महाराष्ट्राच्या समोर आणण्याची आवश्यकता होती.

Devendra Fadnavis-Sharad Pawar
Rahul Gandhi Manipur Tour : राहुल गांधींचा ताफा मणिपूरमध्ये पोलिसांनी रोखला; आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तोडफोड, गांधी इंफाळकडे रवाना

चर्चा आमची सगळी झाली. तुम्हाला काही करून आमची मदत हवी असेल तर कसली मदत, काय आहे, कशासाठी, काय लाईन या सर्व गोष्टी बोलल्याशिवाय कोणी चर्चा करतं का. मी तीन दिवसांनी माघार घेतली असे ते म्हणत असतील तर मग त्यांनी शपथ का घेतली. मी टाकलेला डाव होता की आणखी काय, याबाबत तुम्ही तुम्हाला पाहिजे तो अर्थ काढा, असेही पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com