Sakal Saam Survey: विरोधकांमधून पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पंसती कोणत्या नेत्याला?

Sakal-Saam Mahasurvekshan: 'सकाळ-साम'च्या माध्यम समूहाने केलेल्या सर्वेक्षणात मतदारांनी 'या' नावाला दिली सर्वाधिक पसंती.
Mamata Banerjee, Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Mamata Banerjee, Rahul Gandhi, Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

9 years of Narendra Modi Government: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. तर आगामी लोकसभा निवडणुका पुढच्या वर्षी आहेत. विरोधी पक्ष देखील 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, आगामी निवडणुकीत विरोधकांमधून पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पंसती कोणत्या नेत्यांना मिळणार? हे जाणून घेण्यासाठी 'सकाळ-साम'च्या वतीने महाराष्ट्रातील मतदारांचा सर्वे करण्यात आला आहे.

या सर्वेच्या माध्यमातून लोकभावनेचा अंदाज समोर आला आहे. राज्यभरातील सर्व स्तरातील तब्बल 49 हजार लोकांशी बोलून हा सर्वे करण्यात आला आहे. यामध्ये विरोधकांमधून पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पंसती कोणत्या नेत्यांना द्याल? हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाखाली विरोधी पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांचे पर्याय देण्यात आले होते.

Mamata Banerjee, Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Sakal-Saam Survekshan: नऊ वर्षानंतरही पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कायम!

या नावामध्ये ममता बनर्जी, राहुल गांधी, नीतीश कुमार, एम के स्टालिन, अरविंद केजरीवाल, के.चंद्रशेखर राव, यापैकी एकही नाही आणि सांगता येत नाही, असे पर्यांय देण्यात आले होते. तर या पर्यायांपैकी राहुल गांधी यांच्या नावाला तब्बल 34.9 टक्के लोकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांच्यानंतर 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांच्या नावाला 12 टक्के लोकांनी प्रतिसाद दिला आहे.

यापैकी एकही नाही, हा पर्याय 23.2 टक्के तर सांगता येत नाही, हा पर्याय 16.7 टक्के लोकांनी निवडला आहे. अर्थात विरोधकांमध्ये पंतप्रधान म्हणून वरील कुणाच्याही नावाला सहमती देण्यास 23.2 टक्के लोकांनी नकार दिला आहे. तर सांगता येत नाही, हा पर्याय 16.7 टक्के लोकांनी निवडला आहे.

Mamata Banerjee, Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Sakal Saam Survey : 2024 ला कोणता पक्ष निवडून यावा असे वाटते? 'सकाळ'च्या महासर्वेक्षणामध्ये नागरिक म्हणतात...

विरोधकांमधून पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पंसती कोणत्या नेत्यांना द्याल?

- कुणाच्या नावाला पंसती?

- ममता बॅनर्जी : 4.5 टक्के

- राहुल गांधी : 34.9 टक्के

- नितीश कुमार : 4.1 टक्के

- एम के स्टलिन : 1.8 टक्के

- अरविंद केजरीवाल : 12 टक्के

-के चंद्रशेखर राव : 2.9 टक्के

- यापैकी एक ही नाही : 23.2 टक्के

- सांगता येत नाही : 16.7 टक्के

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com