Ramesh Chennithala: महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी रमेश चेन्निथला कोण आहेत ?

Congress : महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची धुरा काँग्रेसचे नेते, माजी मंत्री रमेश चेन्निथला यांच्यावर सोपवण्यात आली.
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा निर्णय घेत अनेक राज्यांचे प्रभारी बदलले आहेत. लोकसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने राज्यांचे प्रभारी आणि इतर महत्वांच्या पदाची घोषणा शनिवारी केली. यामध्ये महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची धुरा काँग्रेसचे नेते, माजी मंत्री रमेश चेन्निथला यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे मावळते प्रभारी एच.के.पाटील यांच्यानंतर थेट केरळचे माजी विरोधी पक्षनेता आणि आक्रमक काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांच्याकडे प्रभारी पद देण्यात आले. रमेश चेन्निथला हे इंदिरा गांधी यांच्यासोबत नागपूर येथे अविनाश पांडे (उत्तर प्रदेश प्रभारी) यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात आले होते.

तर इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासोबत त्यांनी काम केले असून गांधी घराण्याशी एकनिष्ठ अशीच त्यांची ओळख आहे. त्यामुळे रमेश चेन्निथला यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारी पद काँग्रेसने दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramesh Chennithala
Congress News : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; महाराष्ट्राचे प्रभारी बदलले, 'यूपी'तून प्रियांका गांधींना डच्चू

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा असून ठाकरे गटाने 23 जागांवर दावा केला, तर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्रातील जागांवर कुठलाही दावा केला नाही. इंडिया आघाडीत काँग्रेसची महत्वाची भूमिका असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव महाराष्ट्रात झाला होता. त्यानंतर काँग्रेसला उर्जा देण्यासाठी एच.के.पाटील यांना आणले होते.

आता काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या आधी रमेश चेन्निथला यांच्याकडे महाराष्ट्र राज्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घेत महाराष्ट्रात इंडिया आघाडीला किती जागा मिळतात, याकडे सर्वांचे असणार आहे. तर रमेश चेन्निथला यांनी केरळ स्टुडंट युनियन मध्ये 1970 साली त्यांनी युनिट सेक्रेटरी पद भूषवित ते पुढील दहा वर्षात त्यांनी थेट केरळ राज्य प्रेसिडंट पदापर्यंत बाजी मारली.

1982 मध्ये ते 'एनएसयुआय'चे नॅशनल प्रेसिडंट होते. त्याच वर्षी त्यांनी केरळच्या हरिपद विधानसभेतून विजय मिळवला. केरळमध्ये सर्वात तरुण मंत्री म्हणून वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी ग्रामविकास मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. 1989 मध्ये कोट्टायम लोकसभेतून ते खासदार झाले. त्यानंतर ते चारदा खासदार राहिले. तर काँग्रेस (Congress) वर्किंग कमिटीचे ते सदस्यही आहेत.

हिंदी व इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व आहे. केरळचे गृहमंत्री पद देखील त्यांनी भूषविले होते. केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेता होते. बॅचलर ऑफ आर्ट पर्यंत शिक्षण घेत त्यांनी नंतर एलएलबीचेही शिक्षण घेतले. त्यांना दोन मुलं असून रोहित फिजिशयन आहे तर, रामीत यांनी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस उत्तीर्ण केली आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Ramesh Chennithala
Congress Manifesto Committee : काँग्रेसची 'जाहीरनामा समिती' जाहीर; महाराष्ट्राच्या एकाही नेत्याचा समावेश नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com