मोदींनी नोटाबंदी केली तर फडणवीस शाळा बंद करत आहेत - अजित पवार

या शासनाच्या मनमानी कारभाराचा लोकांना कंटाळा आला आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापाऱ्यांबद्दल सरकारला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा उरलेला नाही. दिवंगत नेते यशवंतराव चव्हाणांनी जेष्ठ नेते शरद पवारांना बेरजेचे राजकारण शिकवले. तेच राजकारण आपणही पुढे नेत आहोत असे सांगतानाच पुढील काळात जेष्ठांचा अनुभव आणि नव्यांना सोबत घेऊन राजकारण करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
मोदींनी नोटाबंदी केली तर फडणवीस शाळा बंद करत आहेत - अजित पवार

गेवराई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. त्यांनी देशात नोटबंदी केली, फडणवीस राज्यात शाळा बंद करतायेत अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. 

राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात काढण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत गेवराईत पवार बोलत होते. राज्यातील सरकार सध्या मस्तीत आहे, ती उतरवण्यासाठी आगामी काळात विचारपूवर्क मतदान यंत्राचे बटन दाबा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. 

या शासनाच्या मनमानी कारभाराचा लोकांना कंटाळा आला आहे. सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापाऱ्यांबद्दल सरकारला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा उरलेला नाही. दिवंगत नेते यशवंतराव चव्हाणांनी जेष्ठ नेते शरद पवारांना बेरजेचे राजकारण शिकवले. तेच राजकारण आपणही पुढे नेत आहोत असे सांगतानाच पुढील काळात जेष्ठांचा अनुभव आणि नव्यांना सोबत घेऊन राजकारण करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. 

अमरसिंह पंडित यांच्या कामाचे देखील त्यांनी भाषणातून कौतुक केले. अमरसिंह यांनी मोठ्या प्रयत्नाने जयभवानी सहकारी साखर कारखाना सुरु केला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे गौरवोद्दगार अजित पवार यांनी यावेळी काढले. 

यावेळी धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, आमदार अमरसिंह पंडित, नवाब मलिक, जयसिंह सोळंके, माजी मंत्री राजेश टोपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विद्या चव्हाण, चित्रा वाघ, संग्राम कोते पाटील आदींची उपस्थिती होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com