Navneet Rana: नवनीत राणांची 'हनुमान उडी' बच्चू कडू रोखणार का?

Amravati Lok Sabha Analysis: काँग्रेसला अमरावतीत यंदा ‘अ‍ॅडव्हॉन्टेज’ असल्याचे जाणकार सांगू लागले आहेत, भाजपच्या उमेदवाराकडून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे, पण गुलाल कोण उधळणार हे येत्या चार तारखेलाच कळेल.
Amravati Lok Sabha Analysis
Amravati Lok Sabha AnalysisSarkarnama

राजेश चरपे

Nagpur New: अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहारचे उमेदवार प्रशांत बूब आणि भाजपकडून नवनीत राणा यांच्यात सामना रंगणार आहे. नवनीत राणांचा (Navneet Rana) पराभव करण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा असेल. नवनीत राणांच्या पराभवाचे सर्वात मोठे श्रेयही रवी राणांना जाईल, असा टोला बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी काही दिवसापूर्वी लगावला आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस,असा राष्ट्रीय स्तरावरील थेट मुकाबला रंगणार होता. मात्र बच्चू कडू यांनी यात उडी घेतली. त्यामुळे मतमोजणीच्या उंबरठ्यावरसुद्धा विजयाबाबत फिफ्टी-फिफ्टीचे समिकरण लावले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून नवनीत राणा यांनी भाजपात घेतलेल्या 'हनुमान उडी'ला रोखण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी लावलेल्या फिल्डिंगमुळे अमरावतीत धक्कादायक निकालाची शक्यता नाकारता येत नाही.

अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत एकाही ठिकाणी भाजपचा आमदार नाही. नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते फारसे सक्रिय नव्हते, अशी कुजबूज आहे. परंतु त्यांची बाजू लंगडी असल्याचे मानणे चुकीचे ठरू शकते. कारण रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानची संपूर्ण टीम सुरवातीपासूनच सक्रिय होती. त्यामुळे नवनीत राणा यांच्या उमेदवारीचा भाजपला नेमका फायदा होईल की तोटा? याचीच चर्चा सुरू आहे.

एकीकडे काँग्रेसला या मतदारसंघात यंदा ‘अ‍ॅडव्हॉन्टेज’ असल्याचे जाणकार सांगू लागले आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवाराकडून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे, पण गुलाल कोण उधळणार हे येत्या चार तारखेलाच कळेल. दोन बलाढ्य राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह यंदाच्या निवडणुकीत असल्याने या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या अस्तित्वाची ही लढाई ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यंदा नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार असल्याने त्यांनी धोका दिल्याची भावना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मतदारांमध्ये होती. त्याचेच प्रतिबिंब या निवडणुकीच्या मतदानात दिसून येणार असल्याचे मानले जात आहे. त्याचाच फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

  • १९९१ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ १९९६ साली शिवसेनेने त्यांच्याकडून हिसकावून घेतला.

  • १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत रिपाइंचा उमेदवार विजयी झाला होता.

  • २००४ ते २०१४ पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेच्याच ताब्यात राहिला.

  • २०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या समर्थनावर हा मतदारसंघ जिंकला.

    Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com