Prakash Ambedkar : बाबासाहेब ते बाळासाहेब काँग्रेससोबत लढा!!!

Vanchit Bahujan Aghadi : ‘हिंदू सुधारणे’साठी आंबेडकरांना भाजपाने जवळ केले तर..?
Babasaheb Ambedkar & Prakash Ambedkar
Babasaheb Ambedkar & Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

National Politics : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस सोबत लढा दिला. आता त्यांचे नातु ॲड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस सोबत लढा देत आहेत. हा लढा देताना त्यांनी कधीही लोकहित पाहता भाजपाचा हात धरलेला नाही. त्यांच्यासोबत गेले. मागील अनेक निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसच्या सोबत जाण्याची मनोमन इच्छा असताना काँग्रेसच्या राजकारणामुळे प्रकाश आंबेडकर आता कंटाळल्याचे चित्र आहे.

भविष्यात त्यांनी ‘हिंदू सुधारणे’साठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यासोबत हात मिळवणी केली तर कुणालाही आश्चर्य वाटू नये, अशी काय ती स्थिती काँग्रेसने निर्माण केल्याचे चित्र राज्यात आहे. आंबेडकरांना पाडण्याचा विडाच काँग्रेसने घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्याचा अनुभव आला. आता तोच अनुभव त्यांचे नातु ॲड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांना येत आहे.

Babasaheb Ambedkar & Prakash Ambedkar
Maha Vikas Aghadi Parties : अखेर ‘वंचित’ला महाविकास आघाडीकडून निमंत्रण, पण...

‘वंचित’ सोबत काँग्रेस आघाडीबाबत ‘सिरियस’ नसल्याचे चित्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या ताज्या पत्रावरुन दिसून येत आहे. हिंदू कोड बिलावरून काँग्रेससोबत वाद झाल्यानंतर केंद्रिय कायदा मंत्री पदावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 27 सप्टेंबर 1951 मध्ये राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेच देशाची पहिली लोकसभा निवडणूक लागली. तेव्ही द्विसदस्यीय प्रणाली अस्तित्वात होती.

उत्तर मुंबई मतदार संघातून सर्वसाधारण जागेवर समाजवादी नेते अशोक मेहता यांनी तर राखीव मतदार संघातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निवडणुकीत उतरले. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलावरुन राजीनामा दिल्याने आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांसोबत त्यांचे बिनसले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसच्या नारायण काजरोळकर यांनी 14 हजार मतांनी पराभूत केले. त्यानंतर 1954 मध्ये झालेल्या भंडारा पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसच्या भाऊराव बोरकर यांनी बाबासाहेबांना पराभूत केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोला लोकसभा निवडणुकीत 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसच्या मुस्लिम उमदेवारामुळे प्रकाश आंबेडकर यांना भाजपाकडून पराभव स्वीकारावा लागला. या दोन्ही निवडणुकीत अगदी शेवटपर्यंत काँग्रेसने तेव्हाचा भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी होत आहे, आम्ही आघाडी करत आहोत असे सांगत झुलवले. ऐनवेळी काँग्रेसने 2014 मध्येच पडलेला मुस्लिम उमेदवार 2019 मध्ये ‘रिपिट’ केला. त्यामुळे काँग्रेसचे या दोन निवडणूकीत प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेत जिंकण्यासाठी नाही तर पाडण्यासाठीच मदत केल्याचा इतिहास आहे.

काँग्रेसला दोन्ही वेळा मुस्लिम उमेदवार उभा करण्याचा सल्ला कोणी दिला हे देखील जगजाहिर आहे. यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील ‘वंचित’ने राज्यात महाविकास आघाडी आणि देशातील ‘इंडिया’ आघाडीत सहभागी होण्यासाठी वारंवार काँग्रेसचे दार ठोठावले. इतकेच नव्हे तर शिवसेना उद्धव बाहासाहेब ठाकरे यांना वकिल केले. कधी नव्हे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत जुळवून घेतले. असे असताना आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘वंचित’ला पत्र पाठवित आघाडीच्या चर्चेला येण्याचे निमंत्रण दिले.

Babasaheb Ambedkar & Prakash Ambedkar
Lok Sabha Election 2024 : ‘वंचित’ने केली अकोल्यात काँग्रेसच्या इच्छुकांची कोंडी

‘इंडिया’ आघाडीत समाविष्ट करण्यासाठी ‘वंचित’ने पहिलेच काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निमंत्रण देण्याची मागणी केली. त्याच बरोबर शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार यांच्या सहीचे पत्र पाहिजे, असे स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांचा वाद तर न्यायप्रविष्ठ आहे, त्यांचे पत्र ‘वंचित’ कसे स्वीकारणार असा प्रश्न ‘वंचित’च्या नेत्यांना पडला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सहीच्या निमंत्रणाची ‘वंचित’ची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी धुडकावून लावत स्वतःच्या सहीने पत्र दिले. प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रावर नाना पटोले यांना काँग्रेस श्रेष्ठींनी आघाडी करण्याचा अधिकार दिले का? अशी विचारणा तर केलीच याशिवाय नाना पटोले यांचा डोक्याचा ‘लोचा’ झाल्याचा आरोप करत काँग्रेसला जोरदार उत्तर दिले. पुण्यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी निवडणूक घोषित झाल्यावर ‘वंचित’ला महाविकास आघाडीत घेऊ असे सांगितले. त्यामुळे काँग्रेस मध्ये एकवाक्यता नाही. अशा परीस्थितीत गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार काँग्रेसला पत्र पाठवून महाविकास आणि इंडिया आघाडीत येण्याची तयारी ‘वंचित’ने दाखविली होती. काँग्रेसने वारंवार ‘वंचित’ला टाळण्याचा केलेला उद्योग पाहता भाजपा आणि आरएसएसने भविष्यात वंचितला ‘हिंदू सुधारणे’च्या व्यापक उद्देशाने जवळ केले तर देशात नवी समरसता क्रांती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

Edited By : Prasannaa Jakate

Babasaheb Ambedkar & Prakash Ambedkar
Mahavikas Aghadi Meeting : निमंत्रणानंतरही ‘वंचित’ची महाआघाडीच्या बैठकीस दांडी; आंबेडकरांच्या मनात तरी काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com