व्यवहार मराठी करा; मनसेचा बॅंकांना इशारा 

व्यवहार मराठी करा; मनसेचा बॅंकांना इशारा 

मुंबई : महाराष्ट्रातील बॅंकांचे व्यवहार मराठीत झालेच पाहिजेत, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत दिला होता. याच पार्श्वभूमीवर आज वांद्रे-कुर्ला संकुलातील पंजाब नॅशनल बॅंक, युनियन बॅंक व अलाहाबाद बॅंकेच्या व्यवस्थापकाना निवेदन देण्यात आले.

बॅंकांनी मराठीत व्यवहार करणे हा आरबीआयचा नियम असल्याने बॅंका ते करणे का टाळत आहेत ? तसेच यापुढे हे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे बॅंकांना दणका देईल, असा इशारा वांद्य्रातील मनसेचे उपविभाग अध्यक्ष अखिल चित्रे यांनी 'सरकारनामा' शी बोलताना दिला. 

वांद्रे-कुर्ला या परिसरात अनेक बॅंकांचे मुख्य कार्यालये आहेत. इथे भारतातील नाही तर आंतरराष्ट्रीय बॅंकांचेही कार्यालये आहेत. आम्ही आज फक्त या तीन बॅंकांमध्ये जाऊन पत्र देऊन आलो आहोत. परंतु येणाऱ्या दिवसांत प्रत्येक बॅंकांमध्ये मनसेचे हे पत्रक पोहचेल. भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय बॅंकांना सुद्धा त्यांचे व्यवहार मराठीत करायला भाग पाडू, असेही चित्रे यांनी स्पष्ट केले. 

बॅंकांनी अजून दोनशे भाषांत त्यांचे व्यवहार करावेत, आम्हाला त्याचा विरोध नाही. परंतु महाराष्ट्रात मराठीतून व्यवहार करणेही बॅंकांना अनिवार्य आहे, असेही चित्रे म्हणाले. राज ठाकरे यांनी ठाणाच्या सभेत सांगितल्याप्रमाणे मनसैनिक या सगळ्या बॅंकांमध्ये जाऊन पत्र देईल, भल्याबुराने ऐकले तर ठीक नाहीतर मनसेचा दणका दाखवून देऊ, असा इशाराही चित्रे यांनी बॅंकांना दिला आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com