भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेलांविरोधात प्रकाश आंबेडकरांची मोर्चेबांधणी 

 भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेलांविरोधात प्रकाश आंबेडकरांची मोर्चेबांधणी 

मुंबई : नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. सत्ताधारी भाजपकडून कोणाला उमेदवारी द्यायची हे निश्‍चित नसले तरी या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल उभे राहिल्यास त्यांना पाडायचे असा निर्धार प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने केला आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पटेल यांना पराभूत करा असा संदेश मतदारसंघातील तरुणांना दिला जात आहे. 
1952 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कॉंग्रेसच्या नारायण कोजरोळकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. हिंदू कोड बिलाचा आग्रह , ओबीसीसाठी राखीव जागा याचा आग्रह केल्यामुळे सवर्ण हिंदु हे आंबेडकरांवर अगोदर उखडलेले होते त्यात आंबेडकर यांनी समाजवादी पक्षाशी केलेली मैत्री कम्युनिस्ट नेते श्रीपाद डांगे यांना आवडली नव्हती. मात्र त्याचा फटका 1954 च्या भंडारा पोटनिवडणुकीत आंबडेकर यांना बसला आणि दुसऱ्यादा निवडणुकीत त्याना पराभव सहन करावा लागला होता. 

आता भाजपचे खासदार नाना पटोले यांनी लोकसभा सदस्यांचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी होणाऱ्या पोट निवडणूकीत संभाव्य उमेदवार पटेल यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांच्याकडे मतदारसंघातील तरुण कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी सोपवली आहे. भंडारा, तुमसर, तिरोरा, गोंदिया, गोरेगाव पवनी या ठिकाणी येत्या 13 ते 16 एप्रिल दरम्यान ते दौऱ्यावर आहेत. भंडारा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय म्हणाले, की या मतदार संघातील 14 लाख मतदारांपैकी साडे सहा लाख मतदार दलित, आदिवासी, मुस्लिम समाजातील आहेत. भीमा कोरेगाव प्रकरण, अट्रोसिटीचे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण पाहता तरुणांमध्ये अन्यायाविरोधात चीड निर्माण झाली आहे, त्याचे पडसाद या पोटनिवडणुकीत उमटलेले दिसतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com