साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणतात, शुद्राला शूद्र म्हणल्यास वाईट का वाटतं..?

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर या कायम वाद ओढवून घेत असतात. आता त्यांनी नवीन वाद निर्माण केला आहे.
bjp mp sadhvi pragya singh thakur creates new controversy over caste system
bjp mp sadhvi pragya singh thakur creates new controversy over caste system
Published on
Updated on

भोपाळ : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या कायम वादग्रस्त विधाने करण्यात आघाडीवर असतात. त्यांच्या या विधानांमुळे त्या कायम चर्चेच राहत असतात. आता सीहोरमध्ये आयोजित एका क्षत्रिय संमेलनात त्यांनी चातुर्वण्य व्यवस्थेचे समर्थन करीत नवा वाद ओढवून घेतला आहे. 

क्षत्रिय संमेलनात बोलताना साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की, आपल्या धर्मात समाज व्यवस्थेसाठी चार वर्ग निश्चित केले आहेत. क्षत्रियांना क्षत्रिय म्हटल्यास वाईट वाटत नाही. ब्राह्मणांना ब्राह्मण म्हणल्यास वाईट वाटत नाही. वैश्यांना वैश्य म्हटल्यास वाईट वाटत नाही. शुद्राला शूद्र म्हटलं की लगेच वाईट वाटते. कारण काय तर, समज नसणे. कारण त्यांना समजतच नाही. 

काँग्रेस नेत दिग्विजयसिंह यांचे नाव न घेता त्यांच्यावरही साध्वी प्रज्ञा यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, भगव्या संघटनांना दहशतवादी म्हणणारे लोक क्षत्रिय असूच शकत नाहीत. अशा लोकांना राजा म्हणणे चुकीचे आहे. 

देशाविरोधात काम करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करायला हवा. याचवेळी देशाची सुरक्षा करणाऱ्यांच्या विरोधात कोणताच नसावा, असे साध्वींनी म्हटले आहे. 

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, शेतकरी आंदोलनावर डावे पक्ष आणि काँग्रेसचे नियंत्रण आहे. कृषी कायद्यांमध्ये बदल करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी तुरुंगात टाकायला हवे.  

साध्वी प्रज्ञा या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या स्फोटांमध्ये 10 जण ठार तर 82 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यांना या प्रकरणात अटक झाली होती. नंतर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना 2017 जामीन मंजूर झाला होता. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भोपाळ मतदारसंघातून उभे राहात  काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांचा पराभव केला होता. त्यांनी मोठ्या मताधिक्याने हा विजय मिळवला होता. 

Edited by Sanjay Jadhav

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com