मिनी विधानसेसाठी भाजपचा ठरलाय प्लॅन! 93 हजार बूथ तयार...

भाजपच्या कोर कमिटीची (BJP core committee) आज मुंबईत बैठक पार पडली
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून त्यासाठी पक्षाच्या कोअर समितीची बैठक आज मुंबईत पार पडली. पक्षाचे प्रभारी सी. टी. रवी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीनंतर शेलार यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या कुकृत्याचा कारभाराचा आणि भ्रष्टाचाराचा एक पेपर काढून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकार याबद्दल बदनामीचा कट सुनियोजितपणे तिन्ही पक्ष एकत्र कसे रचत आहेत, याचा भांडाफोड आम्ही जनतेसमोर करणार आहोत. आपल्या खोट्या कल्पनांवर स्वतःच्या विजयाची गुढी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो सफल होऊ शकत नाही. महाराष्ट्रातली जनता त्याला थारा देऊ शकत नाही. येणाऱ्या काळात आम्ही सत्ताधारी आघाडीला सळो की पळो करुन सोडू.

Maharashtra BJP core meeting
Maharashtra BJP core meeting twitter

राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा आणि लेखाजोखा आज आम्ही घेतला. अतिशय नम्रतेने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे राज्यातील 97 हजार 315 बुथपैकी 92 हजार 891 बुथपर्यंतची रचना लागलेली आहे. एक बुथ प्रमुख आणि बरोबर समिती अशी याची संपूर्ण रचना तयार असल्याचा दावा त्यांनी केला. संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष चांदा ते बांदा काम करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात सत्तेत असलेले तीन पक्ष हे काही विभागत असलेले पक्ष असुन कोणी पुणे, मुंबई तर कोणी रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काही पक्ष पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागापुरते मर्यादित आहेत. आघाडीतील एक पक्षी जिथे आहे तिथे दुसरा नाही. काही ठिकाणी त्यांचे आपापसात मारामारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्णपणे केवळ भारतीय जनता पक्षाच्या बुथ ते विधानसभेपर्यंतची रचना आम्ही पूर्ण करू शकलो. त्याचा लेखाजोखा या बैठकीत आम्ही घेतल्याचे त्यांनी सांगितले.

BJP core meeting
BJP core meeting twitter

नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आमच्या कल्पने नुसार महाराष्ट्रात एका अर्थाने मिनी विधानसभेच्या निवडणुका होतील. जवळजवळ 274 नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, खरेदी-विक्री संघाच्या, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत . त्यामुळे त्यांची पूर्ण रचना आम्ही केली असून, शत-प्रतिशत भाजपा हाच आमचा नारा असल्याचे त्यांनी जाहीर केले.

तिघाडीतील तिघांनी मिळून यावे, आपापसात पायात पाय घालून यावे, या निवडणूका जिंकण्यासाठीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. त्यासाठी आवश्यक व्यक्ती, परिवार, संघटना याबाबतच्या योजना आमच्या तयार आहेत. दिवाळीनंतर एक चिंतन बैठक आमची होईल. आमच्या संपर्कात आजही काही लोक, परिवार, स्थानिक नेतृत्व आहेत. आजच त्याबाबत अधिक बोलता येणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासह आणि पक्षाचे पदाधिकारी यांचे दौरे आणि प्रवास आता सुरू होतील. निवडणूका जिंकण्यासाठीचा आराखडा तयार झाला आहे. येणाऱ्या काळामध्ये जानेवारी ते डिसेंबर या महिन्यांमध्ये जवळजवळ 15 विधानपरिषदेच्या निवडणुकांमधील सुद्धा आमच्या ताकदीच्या आधारावर अधिकचे यश मिळेल, याचे राजकीय विश्लेषण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com