Karad South BJP Vs Congress : कराड दक्षिणची बदलती समीकरणं ; भाजपच्या डावपेचांसमोर कॉंग्रेसला बालेकिल्ला राखण्याचे आव्हान!

Karad South Constituency Politics News : कराड दक्षिण हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असुनही तो भाजपच्या उमेदवाराला प्लस झाल्याने अतुल भोसलेंसह भाजपच्या नेत्यांचा विश्वास दुणावला आहे.
BJP and Congress Flags
BJP and Congress FlagsSarkarnama

Karad Congress News : कराड दक्षिण म्हणजे काँग्रेस अशी मतदारसंघाची ओळख यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील-उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्माण केली आहे. ही परंपरा खंडीत करण्यासाठी अतुल भोसलेंकडून भाजपच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.

इतिहासात पहिल्यांदाच उदयनराजे भोसलेंच्या रुपाने भाजपचा खासदार निवडून आला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिणमध्ये भाजपचा आमदारही निवडून आणण्यासाठी भाजपने फिल्डींग लावली आहे.

अतुल भोसलेंनी मलकापुर नगरपालिकेतील काँग्रसचे तीन ते चार नगरसेवक फोडून डाव टाकला आहे. त्यानंतर त्यांनी कराड शहरात लक्ष घातले आहे. भाजपचा(BJP) एक-एक डाव यशस्वी होत असल्याने काँग्रेसपुढे बालेकिल्ला राखण्याचे मोठे आव्हान आहे.

सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदारसंघाने आजअखेर काँग्रेसच्या विचारांची पाठराखण केली आहे. या मतदारसंघाचे आत्तापर्यंत फक्त यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील-उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण या तीनच नेत्यांनी नेतृत्व केले. सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघापैकी कऱ्हाड दक्षिण हा एकमेव काँग्रेसचा मतदारसंघ आहे. यावर वर्चस्व ठेवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्यांना ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या रयत संघटनेचीही साथ मिळाली आहे.

BJP and Congress Flags
Prithviraj Chavan News : पृथ्वीराज चव्हाणांना धक्का; मलकापूर पालिकेतील काँग्रेसचे चार नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार!

सातारा जिल्हा बँकेतील राजकारणानंतर पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chouhan) आणि ॲड. उंडाळकर गटाने बाजार समितीची निवडणूक एकत्रित लढवत सत्ता ताब्यात ठेवली. त्यानंतर खऱ्या आर्थाने या दोन्ही गटांचे एकदिलाने काम सुरु झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडुन खासदार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे हे निवडणूक रिंगणात होते. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्हा कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी पक्षाच्या ताब्यात द्यायचा नाही, असे धोरण घेवून एकदिलाने प्रचार केला.

निवडणुकीदरम्यान शशिकांत शिंदेच(Shashikant Shinde) निवडून येणार अशी चर्चा होती. त्यांनी मतमोजणीच्या १४-१५ व्या फेरीदरम्यान बाजीही मारली. मात्र त्यानंतर त्याचे मताधिक्य कमी झाले आणि महायुतीचे उदयनराजे भोसले हे खासदार म्हणून निवडून आले.

या विजयात कराड दक्षिणने चांगलीच बाजी मारुन मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना मिळालेल्या ३० हजारांहुन अधिक मतांपेक्षा ६१६ मतं अधिक मिळवण्यात यश मिळवले. त्यासाठी भाजपचे अतुल भोसले यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. कराड दक्षिण हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असुनही तो भाजपच्या उमेदवाराला प्लस झाल्याने अतुल भोसलेंसह भाजपच्या नेत्यांचा विश्वास दुणावला आहे. त्यांनी आता यावेळी विधानसभा जिंकायचीच असा निर्धार करुन त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

BJP and Congress Flags
Prithviraj Chavan : काँग्रेसकडून होणार निवडणूक निकालाची चिरफाड; पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी

काँग्रेसकडून कारणे शोधत विधानसभेची तयारी -

सातारा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य कमी झाले. त्याचबरोबर भाजपच्या उमेदवाराला दक्षिणमधुन ६१६ अधिक मते मिळाली. त्याचा काँग्रेसलाही धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी हे अनपेक्षित असल्याचेही सांगतले आहे. दरम्यान काँग्रेसने कराड दक्षिणमधील मते कशी कमी झाली, भाजपच्या उमेदवाराचे मताधिक्य कसे वाढले, कोणत्या गावात काय झाले याची कारणमिमांसा करण्याचे काम सुरु केले आहे.

माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण, काँग्रेसचे दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी त्यासाठी प्रत्येक पंचायत समिती गणातील नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी, प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन नेमकी कारणे शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यातुनही त्यांची विधानसभेची तयारी सुरु आहे.

भोसलेंचे मलकापुरनंतर कराडवर लक्ष -

विधानसभा आणि मलकापुर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अतुल भोसले यांनी आता एक-एक डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याला यश येत आहे. त्यांनी काँग्रेसचे खंदे समर्थक आणि पृथ्वीराज चव्हाण व कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांचे विश्वासू सहकारी राजेंद्र यादव व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना थेट भाजपमध्येच घेवून ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यातून मलकापुरमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढणार असून तो काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजेंद्र यादव यांचा मलकापूर व परिसरात चांगला प्रभाव आहे. त्याचा फायदा भोसले यांना विधानसभा निवडणुकीसाठीही नक्कीच होईल. आगामी विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही खेळी भाजपसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com