Prithviraj Chavan : काँग्रेसकडून होणार निवडणूक निकालाची चिरफाड; पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी

Congress Leader Prithviraj Chavan Lok Sabha Election 2024 Result : काँग्रेसने निवडणूक निकालात जिथे चांगली किंवा खराब कामगिरी झाली आहे, अशा राज्यांसाठी समिती स्थापन केली आहे. या समित्यांची जबाबदारी पक्षाच्या जेष्ठ नेत्यांना दिली आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Karad News : लोकसभा निवडणुकीत अपयश आलेल्या राज्यांतील निकालाचा आढावा घेण्यास काँग्रेसकडून सुरुवात करण्यात आली आहे. पक्षाला मध्य प्रदेशातही एकही जागा जिंकता आली नाही. छिंदवाडा या कमलनाथ यांच्या गडातही पराभव झाला. याच राज्यातील अपयशाची कारणे शोधण्याची जबाबदारी पक्षाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवली आहे.

काँग्रेसने निवडणूक निकालात जिथे चांगली किंवा खराब कामगिरी झाली आहे, अशा राज्यांसाठी समिती स्थापन केली आहे. या समित्यांची जबाबदारी पक्षाच्या जेष्ठ नेत्यांना दिली आहे. त्यानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी राज्यनिहाय समिती स्थापन केल्या आहेत.

Prithviraj Chavan
Lok Sabha Election Update : EVM मध्ये घोळाची भाजपलाही भीती; मतांच्या पडताळणीसाठी सुजय विखेंसह तिघांची धाव

मध्य प्रदेश राज्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. देशातील छत्तीसगड, ओडिसा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा आदी राज्यात लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. या राज्यांसाठी काँग्रेसने समिती स्थापन केली आहे.

चव्हाण यांच्यासोबत समितीमध्ये सप्तगिरी उल्का, आमदार जिग्नेश मेवानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव तसेच पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविले असून काँग्रेस पक्षाकडून सहा राज्यात प्रभारी पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

Prithviraj Chavan
Governor CV Ananda Bose : पोलिसांकडूनच माझ्या जीवाला धोका! राज्यपालांच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, मध्य प्रदेशात लोकसभेच्या एकूण २९ जागा आहेत. पण त्यापैकी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीत छिंदवाडा या एकमेव मतदारसंघात पक्षाला विजय मिळाला होता. यावेळी या मतदारसंघावरही भाजपने कब्जा केला.

दुसरीकडे उत्तर प्रदेशात काँग्रेससह इंडिया आघाडीला मोठे यश मिळाले आहे. भाजपच्या जागा निम्म्यांहून अधिक कमी झाल्या. पण मध्य प्रदेशात मात्र यश मिळाले नाही. याची कारणे चव्हाण यांना शोधावी लागणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com